महाराष्ट्र

Lok Sabha Election : प्रतिभा धानोरकर दिसताच कार्यक्रमात उडाला गोंधळ

Chandrapur Constituency : चंद्रपुरात सत्कार सोहळा व सामाजिक मेळाव्यातील घटना

Congress News : अनेक वर्ष सत्तेवर असतानाही विकास कामे न करणाऱ्यांना मतदारांनी आता धारेवर धरण्यास सुरुवात केली आहे. विदर्भातीन अनेक गावांमध्ये असे प्रकार घडत आहेत. असाच एक प्रकार चंद्रपूर जिल्ह्यात घडला आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार सोहळा व सामाजिक मेळावा तेली समाजाच्यावतीने आयोजिला करण्यात आला होता. या कार्यक्रमात काँग्रेसला पाठिंबा देण्यात येत असल्याची घोषणा होताच उपस्थित समाजबांधवांनी त्याला चांगलाच विरोध केला. काँग्रेसच्या आमदार प्रतिभा धानोरकर व जिल्हाध्यक्ष आमदा सुभाष धोटे दिसताच लोकांचा पारा आणखी चढला.

Lok Sabha Election : प्रतिभा धानोरकर सुधीर मुनगंटीवार यांच्या नखाचीही बरोबरी करू शकत नाही. 

तेली समाजाच्यावतीने मातोश्री सभागृहात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार सोहळा व सामाजिक मेळावा असे या कार्यक्रमाचे स्वरूप होते. मात्र हा कार्यक्रम ‘हायजॅक’ करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून झाला. आपल्या काही समर्थकांच्या माध्यमातून काँग्रेसने कार्यक्रमस्थळी आमदार धानोरकर यांना पाठिंबा देत असल्याचे जाहीर करून घेतल्याचा आरोप करीत तेली समाजातील अनेकांनी त्यावर आक्षेप घेतला.

तेली युवक मंडळ, विदर्भ तेली समाज महासंघ तथा तेली समाजाच्या इतर संघटनांच्यावतीने तुकुमच्या मातोश्री सभागृहात हा सत्कार व सामाजिक मेळावा सुरू होता. उल्लेखनिय कामगिरीसाठी सुभाष रघाताटे, ॲड.केतन खनके व कवडू लोहकरे यांच्या सत्काराचे औचित्य साधत काँग्रेस सेवादल संघटनेचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत खनके यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला. तेली समाजाच्या सर्व बंधू भगिनींना केवळ सत्कार सोहळा असल्याचे सांगत निमंत्रण देवून एकत्रित आणण्यात आले. याच कार्यक्रमाला प्रतिभा धानोरकर, आमदार सुभाष धोटे यांना निमंत्रित केले गेले.

सत्काराचा कार्यक्रम सुरळीत सुरू होता. अशातच काँग्रेसच्या काही समर्थकांनी धानोरकर यांना पाठिंबा जाहीर केला. सेवादलचे खनके यांनी तेली समाजाच्यावतीने तशी घोषणा केली. त्यामुळे वाद आणखीच भडकला. यावेळी तेली समाजाच्या काही मंडळींनी खनके यांना घेराव करून धक्काबुक्की केली. सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने समाजाला बोलावून अशा प्रकारे पाठिंबा जाहीर करणे योग्य नाही, समाजात राजकारण आणू नका अशीही भावना व्यक्त केली.

सोशलवर निषेध

तेली समाजातील अनेकांनी या घटनेची समाज माध्यमावर निषेध व्यक्त केला आहे. केवळ सत्कार व समाज मेळाव्याचे निमंत्रण देत ऐनवेळी प्रतिभा धानोरकर यांना पाठिंबा जाहीर करून घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न केविलवाणा असल्याची प्रतिक्रिया समाज माध्यमांवर उमटत आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर होते. अशात काँग्रेसचे चंद्रपूर जिल्ह्यासाठी व ओबीसी प्रवर्गातील तेली समाजासाठी कोणते योगदान दिले असा सवालही अनेकांनी उपस्थित केला आहे. पाठिंबा द्यायचाच होता तर काँग्रेसने धाडस करीत ही बाब थेट जाहीर करायची असती. सत्कार आणि सामाजिक मेळाव्याचे निमंत्रण द्यायचे आणि ऐनवेळी पाठिंबा घोषित करायचा, ही बाब चुकीची असल्याचा संताप आता व्यक्त होत आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!