Assembly Election : भाजप हरियाणा हरेल असा काहींचा दावा होता. या पराभवानंतर आपण भाजपवर हल्ला करून अशा तयारीत शरद पवार, उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसवाले होते. पण देशाचा मूड आता त्यांच्याही लक्षात आलेला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत ‘हम साथ साथ है..’म्हणणारे आता ‘हम तुम्हारे है कौन?’ असे म्हणायला लागले आहेत. नागपुरात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही टीका केली.
फडणवीस म्हणाले, विरोधकांनी पसरविलेले ‘फेक नेरेटिव्ह’ संपले आहे. हरियाणाच्या निवडणुकीतून हे दिसून आलं. लोक आता भाजपच्या पाठीशी आहेत. महाराष्ट्राचा वित्तमंत्री असताना आपण आठ नवीन सरकारी मेडिकल कॉलेजची घोषणा केली होती. त्यातील पाच हे विदर्भातील कॉलेज आहे. या पाच कॉलेजचे सुरुवात आता होत आहे. यात गडचिरोली, भंडारा, वाशिम, बुलढाणा, वर्धा येथील कॉलेजचा समावेश आहे. कॉलेजेसमध्ये भर पडल्याने महाराष्ट्राच्या मेडिकलच्या सीट्समध्ये मोठी वाढ होईल. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होईल, असे फडणवीस म्हणाले.
विमानतळाची स्वप्नपूर्ती
मुख्यमंत्री असताना आपण नागपूर विमानतळाचे काम हाती घेतले होते. विमानतळाच्या टेंडरींची प्रक्रिया झाली. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेले. साडेचार वर्ष कोर्टात हा खटला चालला. उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय असा खटल्याचा प्रवास सुरू होती. त्यानंतर विमानतळाच्या कामाला मान्यता मिळाली. आता या विमानतळाचे भूमिपूजन होत आहे. आपल्यासाठी हा क्षण स्वप्नपूर्तीचा आहे. देशातील आधुनिक विमानतळ नागपुरात तयार होणार आहे. कार्गोची सोय होणार आहे. नागपूर आणि महाराष्ट्राच्या विकासात भर घालणारे हे विमानतळ ठरेल. शिर्डीलाही विमानतळ मंजूर करण्यात आलं होतं. आता येथे सुंदर एअरपोर्ट मिळणार आहे.
नागपुरात नाग नदीचे काम सुरू करण्यात आले आहे. पोहरा नदीसाठी साडेसातशे कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजनही होत असल्याचं फडणवीस म्हणाले. एकट्या नागपुरात 12 ते 13 हजार कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन होत आहे. त्याचा आनंद वाटतो असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. महायुतीत (Mahayutit) जागा वाटपाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. जागा वाटपाचे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. उरलेले 20 टक्के काम लवकरच होईल असेही फडणवीस म्हणाले.
ओबीसींचे 52 हॉस्टेल
मुख्यमंत्री असताना आपण राज्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह मंजूर केले होते. त्यानंतर वसतिगृहाच्या कामांना सुरुवातही झाली. पण राज्यात मध्यंतरीच्या काळात सत्ताबदल झाला. महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi)
आपण मुख्यमंत्री असताना एकाही वसतिगृहाचं काम पुढे सरकलं नाही. केवळ वसतिगृह सुरू होत आहेत, अशा थापा मारण्यात आल्या. परंतु एकही वसतिगृह प्रत्यक्षात सुरू झालं नाही. महायुती सरकार आल्यानंतर वसतिगृहाच्या सगळ्या फाइल्सवरील धूळ झटकण्यात आली. आता एकाच दिशवी राज्यातील 52 वसतिगृहांचं लोकार्पण करण्यात येत असल्याचं फडणवीस म्हणाले. त्यामुळे ओबीसी विद्यार्थ्यांना शहरात शिकण्यासाठी हक्काचं स्थान मिळेल. ज्या ठिकाणी वसतिगृह नाही, तेथे विद्यार्थ्यांना भत्ता सुरू राहणार असल्याचं ते म्हणाले.