महाराष्ट्र

Parliament Winter Session : एक देश, एक निवडणूक विधेयक येणार 

NDA Government : देशातील निवडणुकीचे चित्र बदलणार 

One Nation, One Election : केंद्र सरकारकडून प्रस्तावित असलेल्या एक देश एक निवडणूक विधेयकावर यंदा शिक्कामोर्तब होणार आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. याच अधिवेशनामध्ये निवडणुकी संदर्भातील विधेयक सादर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. देशामध्ये एकाच वेळी निवडणूक व्हावी यासाठीचे प्रयत्न सुरू करण्यात आले होते.

एक देश, एक निवडणूक घेता यावी यासाठी समितीची नेमणूक करण्यात आली होती. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल केंद्र सरकारला सादर केला आहे. केंद्र सरकारच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाने या अहवालाला मंजुरी दिली आहे. त्यानंतर आता या संदर्भातील विधेयक लोकसभा आणि राज्यसभेमध्ये सादर करण्यात येणार आहे.

विरोधकांकडून टीका 

सरकारकडून प्रस्तावित असलेल्या एक देश, एक निवडणूक विधेयकाबद्दल विरोधी पक्षाकडून टीका केली जात आहे. देशामध्ये अलीकडेच काही ठिकाणी विधानसभा निवडणूक घेण्यात आली. केंद्रीय निवडणूक आयोगाने टप्प्याटप्प्याने ही निवडणूक घेतली. सर्वसाधारणपणे हरियाणासोबत महाराष्ट्र मध्ये निवडणूक प्रक्रिया राबविली जाते. परंतु यंदा जम्मू कश्मीर सोबत हरियाणाची निवडणूक घेण्यात आली. महाराष्ट्राची निवडणूक त्यानंतर जाहीर करण्यात आली.

केंद्रीय निवडणूक आयोगाने जम्मू-काश्मीर आणि हरियाणा या दोन राज्यांमध्ये सोबत निवडणूक घेतली. महाराष्ट्र आणि झारखंड मध्ये त्यानंतर निवडणूक घेण्यात आली. यावरून विरोधी पक्षाने निवडणूक आयोग आणि सरकारवर टीका केली होती. निवडणूक आयोग आणि सरकार चार राज्यांमध्ये एकत्र निवडणूक घेऊ शकत नाही. अशा परिस्थितीत एक देश एक निवडणूक प्रक्रिया काय राबवणार, असा प्रश्न विरोधकांनी केला होता.

विधेयक येणार 

विरोधकांच्या टीकेला उत्तर देत बसण्यापेक्षा केंद्र सरकारने एक देश, एक निवडणूक विधेयक संसदेमध्ये सादर करण्याची तयारी केली आहे. सध्या सुरू असलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात हे विधेयक पटलावर ठेवले जाणार आहे. राज्यसभा आणि लोकसभा दोन्हीकडे विधेयकाला मंजुरी मिळावी यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. संपूर्ण देशात एकाच वेळी निवडणूक कशी घेतली जाणार, या संदर्भातील अनेक प्रश्न आहेत. या सर्व प्रश्नांचे समाधान केंद्र सरकारला करावे लागणार आहे.

Sudhir Mungantiwar : सावरकरांच्या फोटोवरून संतापले मुनगंटीवार

महाराष्ट्रामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर मतदान यंत्रांवर संशय व्यक्त केला जात आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन सुरू करण्यात आली आहे. लोकसभेचे विरोधी पक्ष नेते तथा काँग्रेस खासदार राहुल गांधी या आंदोलनामध्ये उतरले आहेत. राज्यामध्ये महाविकास आघाडी आणि केंद्रामध्ये इंडिया आघाडीकडून मतपत्रिकेवर निवडणूक घेण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे विरोधी पक्ष एक देश, एक निवडणूक विधेयकाला मंजुरी देताना कोणते प्रश्न सरकारला विचारतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!