महाराष्ट्र

Lok Sabha Election : येथील मतदान केंद्रांवर प्रत्येकी दोन ‘बॅलेट’ युनिट !

Fourth Phase : सर्वाधिक 24 उमेदवार रिंगणात

Lok Sabha Election : चौथ्या टप्प्यातील रावेर लोकसभा मतदासंघाच्या निवडणुकीसाठी सोमवारी रावेरमधून 5 जणांनी माघार घेतली. त्यानंतर रावेरमध्ये आता सर्वाधिक 24 उमेदवार रिंगणात आहेत. 16 पेक्षा जास्त उमेदवार असल्याने रावेर मतदारसंघातील प्रत्येक मतदान केंद्रांवर प्रत्येकी दोन ‘बॅलेट युनिट ‘द्वारे मतदान प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. त्यामुळे कडाक्याच्या उन्हासोबतच मतदान प्रक्रियेचा ‘ताप’ वाढणार आहे.

छाननी आटोपल्यानंतर रावेरमधून 29 जणांचे अर्ज शिल्लक होते. सोमवारी माघारीच्या शेवटच्या दिवशी जळगावमधून सहा जणांनी तर रावेरमधून 5 जणांनी माघार घेतली. चिन्हवाटप रिंगणातील अपक्ष उमेदवारांना सोमवारी दुपारी करण्यात आले. काही जणांनी निवडणूक आयोगाच्या सूचित नसलेल्या चिन्हांची मागणी केली होती. निवडणूक प्रशासनाने मात्र,त्यांची मागणी फेटाळली.

प्रत्येक बॅलेट युनिट डिव्हाइसमध्ये फक्त 16 उमेदवारांची नावे असू शकतात आणि चिक्कोडीमध्ये एकूण 24 उमेदवार रिंगणात आहेत. उर्वरित 8 उमेदवारांसाठी अतिरिक्त बॅलेट युनिट आणि NOTA पर्याय जोडणे आवश्यक असल्याने या मतदारसंघात आता मतदानकेंद्रांवर प्रत्येकी दोन ‘बॅलेट युनिट ‘द्वारे मतदान प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

Lok Sabha Election : गरिबांच्या मुलांना डाॅक्टर, इंजिनिअर बनवणार

हे आहेत रिंगणात उमेदवार

श्रीराम दयाराम पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट), रक्षा निखील खडसे (भाजप), संजय पंडीत ब्राम्हणे (वंचित बहुजन आघाडी), विजय रामकृष्ण काळे (बहुजन समाज पार्टी), अशोक बाबुलाल जाधव, (पीपीआय), संजयकुमार लक्ष्मण वानखेडे (रिपाइं), वसंत शंकर कोलते (बहुजन मुक्ती पार्टी),गुलाब दयाराम भील (भारत आदिवासी पार्टी), अनिल पीतांबर वाघ (अपक्ष), अमित हरिभाऊ कोलते (अपक्ष), प्रा.डॉ. आशिष सुभाष जाधव (अपक्ष),एकनाथ नागो साळुंके (अपक्ष), कोमलबाई बापुराव पाटील (अपक्ष), जितेंद्र पांडुरंग पाटील (अपक्ष),प्रविण लक्ष्मण पाटील (अपक्ष), भिवराज रामदास रायसिंगे (अपक्ष), ममता उर्फ मुमताज भिकारी तडवी (अपक्ष), युवराज देवसिंग बारेला (अपक्ष), डॉ. योगेंद्र विठ्ठल कोलते (अपक्ष), श्रीराम ओंकार पाटील (अपक्ष), श्रीराम सीताराम पाटील (अपक्ष), शेख आबीद शेख बशीर (अपक्ष), सागर प्रभाकर पाटील (अपक्ष), संजय प्रल्हाद कांडेलकर (अपक्ष).

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!