महाराष्ट्र

Lok Sabha Election : प्रतिभा धानोरकर, मोघे यांच्या सांगण्यावरून सरपंचाने परतवले प्रचार वाहन !

Chandrapur Constituency : अरे..प्रचारात बरोबरी कराना, असले भ्याड प्रकार कशाला करता !

Congress Leaders : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडायला सुरुवात झाली आहे. गावोगावी प्रचार सभा, रॅली, बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. या निवडणुकीचे क्षेत्र मोठे असते.  तुलनेत प्रचाराला वेळ कमी मिळतो. त्यामुळे उमेदवार विविध माध्यमांतून नाव, चिन्ह, मतदार संघात केलेले काम, दिलेली आश्वासने मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. पण अशा प्रचारात जे पक्ष आघाडी घेऊ शकत नाहीत. ते भांबावतात आणि आपल्या विरोधकाच्या प्रचाराला विरोध करतात. असाच एक प्रकार चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघात यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी तालुक्यातील बारभाई गावात घडला आहे. 

महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचाराचे वाहन बारभाई गावात पोहोचले. गावात एका नागरिकाने वाहनचालकाला विविध प्रश्‍न करीत ते वाहन परतवून लावले. भाजपचे आमदार डॉ.संदीप धुर्वे यांनी या घटनेचा कडाडून विरोध केला आहे. यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर आणि माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्यावर त्यांना कडवी टीका केली आहे. ‘लोकहित’शी बोलताना आमदार डॉ.धुर्वे म्हणाले, विरोधकाच्या प्रचाराशी बरोबरी करता आली नाही की मग भिऊन जाऊन असे प्रकार केले जातात.

सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचाराचे वाहन ज्या व्यक्तीने बारभाई गावातून परतवून लावले तो प्रदीप जाधव सरपंच आहे. तो काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. काँग्रेसचे नेते आमच्या प्रचाराची बरोबरी करू शकत नाहीये. त्यामुळे गावातून प्रचाराचे वाहन परतवण्यासारखे प्रकार केले जात आहेत. ‘असले भ्याड प्रकार काय करता, दम असेल तर आमच्या प्रचाराची बरोबरी करा ना..’, असे म्हणत आमदार धुर्वे यांनी काँग्रेस नेत्यांना खडे बोल सुनावले आहेत. ते म्हणाले, काँग्रेस नेते आमची बरोबरी कधीही करू शकत नाहीत आणि हे जे काही प्रकार ते करत आहेत. ते लोकशाहीच्या विरोधात आहेत.

असाही गैरसमज

काँग्रेस नेत्यांना वाटत असेल की आपण शुरवीरपणाचे काम करत आहोत. पण आज त्या गावातील लोकांच्याही लक्षात आले की, काँग्रेस नेते काहीच करू शकत नाहीत. त्यामुळे आता दादागिरीवर उतरले आहेत. पण दादागिरी हे भाजपचे संस्कार नाहीत. आम्ही त्यांच्या दादागिरीचे उत्तर गांधीगिरीने देऊ. वाहन परतवून लावल्याचा व्हिडिओ व्हायरल करून त्या सरपंचाला वाटत असेलकी आपण महान काम केले. काँग्रेस नेते आपल्याला शाबासकी देतील. पण हे कृत्य करून त्यांना स्वतःची आणि त्याच्या पक्षाची लायकी दाखवून दिली आहे, असे आमदार धुर्वे म्हणाले.

काँग्रेसच्या उमेदवाराला पराभव डोळ्यांसमोर दिसू लागला आहे. त्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांकडून त्या अशी कामे करवून घेत आहेत. पण मतदार हुशार झाला आहे. लोकांना माहिती आहे की, कामे कुणाच्या काळात झाली. चंद्रपूर-वणी-आर्णी या लोकसभा मतदारसंघात एकेकाळी वणी ते नागपूर हे अंतर गाठण्यासाठी चार-पाच तास लागायचे. पण आता केवळ दीड ते पावणेदोन तासांत नागपूर गाठता येऊ शकते. येवढे चांगले रस्ते गेल्या १० वर्षांत झालेले आहेत आणि हा विकास याच काळातील आहे, हे लोकांना चांगले ठाऊक आहे. त्यामुळे असले नीच प्रकार करून विरोधक विकासाला रोखू शकणार नाहीत, असेही आमदार संदीप धुर्वे म्हणाले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!