महाराष्ट्र

Nagpur : फडणवीस-गुडधेंना मजूर, पानठेलाचालकाने दिले आव्हान!

Assembly Election : 30 टक्के उमेदवार व्यवसायिक; शेतकरी, वकील, क्रेनचालकही मैदानात

BJP vs congress : विधानसभेच्या रिंगणात एकीकडे डॉक्टर, इंजिनिअर रिंगणात असून दुसरीकडे बेरोजगार, हातमजूर, पानठेलाचालक व अगदी ऑटोचालकदेखील त्यांचे भाग्य आजमावत आहेत. राज्यातील हायप्रोफाईल मतदारसंघ असलेल्या दक्षिण-पश्चिम नागपुरात तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कॉंग्रेसचे प्रफुल्ल गुडधे यांच्याविरोधात चक्क मजूर, पानठेलाचालक व क्रेनचालकदेखील उतरले आहेत.

नागपूर शहरातील सहाही मतदारसंघांतून 117 उमेदवार रिंगणात आहेत. यातील 36 (30 टक्के) उमेदवारांनी त्यांची उपजीविका व्यवसायावर चालत असल्याचे स्पष्ट केले आहे. 11 (9.40%) उमेदवार वकिली करतात तर 10 (8.54%) उमेदवारांच्या आर्थिक उत्पन्नाचे साधन शेती आहे. तीन डॉक्टरदेखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

याशिवाय पाच मजूर, प्रत्येकी दोन ऑटोचालक-बेरोजगार-ड्रायव्हर हेदेखील मैदानात आहेत. दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातील 12 उमेदवारांपैकी प्रत्येकी तीन जण शेतकरी व खासगी काम करणारे आहेत. दोघांचा व्यवसाय आहे तर एकजण वकील आहे. या हायप्रोफाईल मतदारसंघात एक पानठेलाचालक, एक मजूर तर एक उमेदवार क्रेन चालक आहे. नोकरदार वर्गाला राजकारणापासून दूर राहणारा पांढरपेशा वर्ग असे म्हटले जाते.

या निवडणुकीसाठी काही नोकरदार कार्यकर्त्यांनी विविध पक्षांकडे तिकिटांसाठी मागणी केली होती. मात्र, प्रत्यक्षात बहुतांश जणांच्या पदरी निराशाच पडली. त्यामुळे अनेकांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले आहेत. 25 (21.36 %) उमेदवारांनी ते खासगी काम करत असल्याचे शपथपत्रात नमूद केले आहे तर 2 (1.70 %) उमेदवार या गृहिणी आहेत. दोन शिकवणी वर्गचालकदेखील निवडणुकीत उतरले आहेत.

Nagpur : फडणवीस राज्यात व्यस्त, मतदारसंघाचे काय?

सारा खटाटोप कशासाठी?

बरेचदा निवडणूक ही केवळ हौस म्हणून लढविली जाते. प्रस्थापित पक्ष किंवा प्रस्थापित नेते वगळता इतरांना आपण आमदार किंवा खासदार होणार नाही, हे माहिती असतं. पण तरीही केवळ हौस म्हणून लढायचे आणि लोकांच्या नजरेत यायचे, हाच उद्देश असतो. कर काहीवेळा एका वस्तीमधील किंवा समाजातील दोन-तीन हजार मते घेऊन प्रस्थापितांचे गणीत बिघडविण्याचा देखील उद्देश असतो.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!