Lok Sabha Election : नागपुरच्या कन्हान येथे आज (10 एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराची सभा झाली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, रेती चोरांवर कारवाई करण्याचा थेट इशारा दिला. आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले ‘स्मितहास्य’ चर्चेचा विषय ठरला आहे.
Narendra Modi At Ramtek : टोकाचा विरोध झाला तरी सीएए लागू होणार
काँग्रेसचे लोक रेती चोर आहे.असा उल्लेख करत नवीन वादाला तोंड फोडले आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळात विदर्भात सर्वाधिक रेती चोरी झाली. मात्र आता हे उद्भव ठाकरे यांचे सरकार नाही, हे सरकार गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करीत असलेले सरकार आहे.आम्ही रेती चोरांना सोडणार नाही,ज्यांनी रेती चोरी केली आहे, ज्यानी सरकारचा पैसा आपल्या तिजोरित नेला आहे, त्या रेती चोरांना हिशोब द्यावा लागेल. सरकारचा पैसा सरकारचा तिजोरित जमा करावा लागेल. यावेळी रेती चोरांवर कारवाई करायची ना,त्यांना एक काँग्रेसी नेता मदत करतो आहे.त्यावेळी कोण आहे रेती चोर असा प्रश्न करताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्मितहास्य करताना दिसले.दरम्यान शिंदे गटाच्या एक अपक्ष आमदारावर गौण खनिज चोराच्या आरोप असल्यामुळे त्या आमदाराची चौकशी सुरु असताना देवेंद्र फडणवीसांनी रेती चोरांवर कारवाईची केलेल्या मागणीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हसु आल्याने चर्चेला उधाण आले आहे.
नो वर्बे ओन्ली पारवे
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी रामटेक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राजू पारवे यांचा अनोख्या शैलीत प्रचार केला आहे; रामटेक लोकसभेची जनता राजू पारवे यांना रेकॉर्ड ब्रेक मतदान करून जिंकून देणार आहे.कारण आपला नारा आहे ‘नो वर्बे ओन्ली पारवे’ त्यामुळे ते नक्कीच जिंकून येतील.तर दुसरी कड़े नागपुरवरुन नितीन गडक़री यांनाही रेकॉर्ड ब्रेक मतदान मिळणार आहे. ही निवडणूक देशाची आहे, त्यामुळे आपल्याला मोदींना निवडून द्यायचे आहे असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.