महाराष्ट्र

BJP Leader : काँग्रेसचा भाजपाला आणखी एक धक्का !

Congress : माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकरांना घेतले पक्षात

भारतीय जनता पक्षाला काँग्रेसने मोठा धक्का दिला. नांदेड जिल्ह्यात भाजपला मोठे खिंडार पाडले. नांदेडचे माजी खासदार, भाजप नेते भास्करराव पाटील खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, युवा नेत्या डॉ. मिनल पाटील खतगावकर यांनी दादर स्थित प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते व माजी मंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

भास्करराव पाटील खतगावकर हे तळागाळातील कार्यकर्ते आहेत. त्यांनी कोणत्याही पदाची अपेक्षा न करता काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला आहे. नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते पदाधिकारी व वरिष्ठ नेते यांच्याशी चर्चा करून पक्ष प्रवेशाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. टिळक भवनमध्ये हा पक्ष प्रवेश झाला आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये भव्य कार्यक्रम घेऊन पक्षप्रवेश सोहळा केला जाणार आहे. भास्कराव पाटील खतगावकर यांच्या प्रवेशाने नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसच्या संघटनेला आणखी बळ मिळेल व विधानसभा निवडणुकीत नांदेड जिल्ह्यातूनही काँग्रेसचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील,असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला.

Amravati : उपोषणाचे नाटक करून आरएफओला मागितली खंडणी

भास्करराव पाटील खतगावकर म्हणाले की, काँग्रेस पक्षात प्रवेश करताना पुन्हा माझ्या घरी आल्याचा आनंद होत आहे. काँग्रेस पक्षाने आमदार, खासदार, मंत्रिपदावर काम करण्याची संधी दिली आहे. मध्यंतरी दुसऱ्या पक्षात गेलो होतो, पण आता घरी आलो आहे. नाना पटोले यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष राज्यात मजबूत होत आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू. या पक्ष प्रवेश सोहळ्याला माजी मंत्री डी. पी. सांवत, आमदार मोहनराव हंबर्डे व नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!