देश / विदेश

Lok Sabha : लोकसभेत आवाजी मतदानानंतर पुन्हा ‘ओम’राज

Chairman Election : बिर्ला पुन्हा झाले अध्यक्ष; खासदारांकडून अभिनंदन

National Politics : राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (NDA) उमेदवार ओम बिर्ला यांची बुधवारी (ता. 26) लोकसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा निवड झाली. ते दुसऱ्यांदा अध्यक्ष झाले आहेत. अध्यक्षपदासाठी आवाजी मतदान घेण्यात आले. त्यावेळी सभागृहात ‘ओम’काराचे पारडे जड ठरले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीसाठी प्रस्ताव मांडला. त्यानंतर निवडणूक घेण्यात आली. त्यात बिर्ला विजयी झालेत.

https://whatsapp.com/channel/0029VaUpEJn7YSd10QyUIR35

ओम बिर्ला यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अभिनंदन केले. एनडीए आणि विरोधी पक्षातील विविध नेत्यांकडूनही त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

काँग्रेस नेते के. सुरेश यांची लोकसभा अध्यक्षपदी निवड करण्याचा प्रस्ताव विरोधकांनी मांडला होता. परंतु सभागृहाने आवाजी मतदानानंतर पंतप्रधानांचा प्रस्ताव मंजूर केला. त्यामुळे बिर्ला यांना विजयी घोषित करण्यात आले. ते राजस्थानमधील कोटाचे खासदार आहेत. लोकसभा अध्यक्ष पदाबाबत एनडीए आणि विरोधी पक्षाचे एकमत झाले नाही. त्यामुळे अलीकडच्या काळात प्रथमच लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आली. यापदासाठी आतापर्यंत फक्त तीन वेळा निवडणूक झाली आहे. 1952, 1967 आणि 1976 मध्ये ही निवडणूक झाली होती.

अशी होते प्रक्रिया

पारंपारिकपणे लोकसभा अध्यक्ष पदाची निवड सत्ताधारी पक्ष आणि विरोधक यांच्यात सहमतीने केली जाते. परंतु यंदा त्यावर सहमती झाली नाही. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने जवळपास शंभरचा आकडा गाठला आहे. त्यामुळे त्यांना विरोधी पक्षनेता पद मिळाले आहे.

Buldhana : घड्याळाने वाचवला भाजप नेत्याचा जीव

भाजपला तगडी टक्कर दिल्यानंतर काँग्रेसने लोकसभा निवडणुकीतही उमदेवार दिला. यातून आगामी पाच वर्षांत काँग्रेस भाजपला वेळोवेळी आव्हान देणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

अध्यक्षपदाच्या शर्यतीत ओम बिर्ला यांच्याशिवाय कोडीकुन्नील सुरेश होते. सुरेश काँग्रेसचे खासदार आहेत. केरळच्या मावेलीकारा येथुन त्यांनी आठ वेळा विजय मिळवला आहे. लोकसभेत सर्वाधिक काळ खासदार राहिलेले काँग्रेसचे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. सुरेश यांचे नाव पुढे करीत काँग्रेसने त्यांना आठ वेळा विजयी झाल्याबद्दल सन्मानित केल्याचे बोलले जात आहे. निवडणूक असल्याने एनडीए आणि विरोधी पक्षातील खासदार आवर्जून सभागृहात उपस्थित होते. लोकसभेचे गठन झाल्या नंतर खासदार म्हणून सर्वांचा शपथविधी देखील आता झाला आहे. पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह 262 नवनिर्वाचित खासदारांनी शपथ घेतली. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यासह उर्वरित 281 नवीन खासदारांचा शपथविधीही होत आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!