Police Action : रामगिरी महाराजांच्या विरोधात बोलले तर मशिदीत शिरून ‘चून चून के मारेंगे’ अशी थेट धमकीच आमदार नितेश राणेंनी दिली होती. रामगिरी महाराजांनी सिन्नरमधील प्रवचणात जो मुद्दा मांडला तो सतत मांडत राहावा. संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी आहे. रामगिरी महाराजांच्या विरोधात कोणी बोललं, कोणी मस्ती केली तर मशिदीत घुसून मारू, असे नितेश राणे म्हणाले होते. नितेश राणेंच्या या धमकीनंतर शुक्रवारी (ता. ६) बुलढाण्यात राजकीय विरोधकांसह मुस्लिम समाज रस्त्यावर इाला. आता या प्रकरणात मोर्चेकऱ्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांची परवानगी नव्हती
बुलढाणा शहरात शुक्रवार 6 सप्टेंबर रोजी भाजपचे आमदार नितेश राणे व रामगिरी महाराज यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. राणे आणि रामगिरी महाराज त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी हिंदु मुस्लिम एकता मंचाच्यावतीने करण्यात आली. मोर्चा काढून नितेश राणेंचा फोटो व प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला होता. या मोर्च्याला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यानंतरही हा मोर्चा काढण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांनी आता 26 जणांसह एकूण 100 ते 125 जणांविरुद्ध मुंबई पोलिस कायद्याच्या कलम 135 अनुसार गुन्हा नोंदवला आहे. बुलढाणा शहर पोलिस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन
बुलढाणाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले होते. मुंबई पोलिस कायद्याच्या कलम 37 प्रमाणे पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई होती. या नियमाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा मोर्चेकऱ्यांविरुद्ध नोदविसण्यात आला आहे. परवानगी न घेता एकत्र जमाव केल्याचा ठपका मोर्चेकऱ्यांवर आहे. शहर पोलिस स्टेशनमध्ये समीर खान नजमुद्दीन खान, सैयद जुनेद डोंगरे, शेख लाल ऊर्फ बबलु शेख मेहबुब, शेख सज्जाद अब्दूल खालीद, मोहमद दानीश अजहब शेख, अॅड. सतीषचंद्र रोठे यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. असलम शहा, डॉ. मोबीन खान, शेख रईस शेख अमीर, शेख अकीब शेख रफीक, वसीम खान अलीम खान यांचेही नाव त्यात आहे.
डझनभर लोकांवर गुन्हे
मोहमद सोफियान अख्बानी, शेख मोहसीन शेख अन्सार, शाकीर हुसेन अजगर हुसेन, मोहमद उमेर मोहमद शाहरुख, शेख शाहरुख शेख याकुब, मोहमद इद्रीस मोहमद अज्जु यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. सैयद मतीन सैयद ईरफान, शेख सोहिल शेख सलीम, जावेद खान नवाब खान, शाहरुख खान नवाब खान, ईम्रान शहा रज्जाक शाह यांनाही पोलिसांनी आरोपी केले आहे. शेख फिरोज शेख गफार ऊर्फ गिड्डु कालु, संयद वसीम सैयद निजाम, मोहमद सोफीयान अब्दुल रब्बानी, सोडा ऊर्फ शेख जावेद शेख सलीम, मोहम्मद जावेद अब्दूल फारुख यांनाही कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. आणखी अनेक लोकांविरुद्धही गुन्हा दाखल झाला आहे. त्यांची नावे निष्पन्न करून कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.