महाराष्ट्र

Offensive Board : खामगावच्या माजी आमदाराविरोधात गुन्हा

Khamgaon : मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह बोर्ड

Assembly Election : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आली आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील राजकारणातील घटना वेगाने घडत आहेत. आरोप-प्रत्यारोपांमध्ये खामगाव सगळ्यात पुढे आहे. खामगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध कार्यक्रम, उपक्रम राबवित आहेत. गुरुवारी (ता. 10) काँग्रेसने आयोजित केलेल्या मेळाव्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह फलक लावण्यात आला. यासंदर्भात ठपका ठेवत पोलिसांनी काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्र्यांबाबत हा बोर्ड होता. काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्यासह दोघांविरुद्ध खामगाव शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी स्वतः हुन हा गुन्हा दाखल केला आहे.

खामगाव शहातील नगर परिषद टर्निंगवर मोठे बॅनर लावण्यात आले होते. त्यावर लापता लेडीज, एक वर्षात 64 हजार महिला बेपत्ता, असा मजकूर होता. चित्रपटासारखे महिलांचे अस्पष्ट फोटो होते. त्याखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यासारखे अर्धवट तोंड झाकलेले चित्र, विचित्र फोटो होते.

तत्काळ कारवाई

याबाबत माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. बॅनर काढण्यात आले. पोलिसांनी याबाबत चौकशी केल्यानंतर बॅनर लावणाऱ्याचे नाव समोर आले. याप्रकरणी शहर पोलिस स्टेशनला कॉस्टेबल नितीन पाटील यांनी तक्रार दिली. त्याआधारे माजी आमदार दिलीप सानंदा व बॅनर कंत्राटदार मनोज शांताराम गुळवे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या बुलढाण्यातील निवडणूक यंदा चुरशीची होणार आहे. बुलढाण्यात शिवसेना विरुद्ध शिवसेना लढत होणार आहे. खामगावात आमदार आकाश फुंडकर आणि दिलीप सानंदा यांच्यात राजकीय युद्ध रंगेल. महाविकास आघाडीसाठी (Mahavikas Aghadi) खामगाव विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला सुटला आहे. महायुतीकडून (Mahayuti) भाजपसाठी हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघ सध्या भारतीय जनता पार्टीचे आमदार आकाश फुंडकर यांच्याकडे आहे. 

Daryapur Constituency : महायुतीत घमासान होण्याचे संकेत

माहोल गरम

काँग्रेसकडून माजी आमदार दिलीप कुमार सानंदा हे फुंडकरांना आव्हान देतील. खामगाव मतदारसंघांमध्ये नेहमीच राजकीय माहोल गरम असतो. आता तर निवडणूक आहे. त्यामुळे आगामी काळातही अनेक घटना-घडामोडी या मतदारसंघात घडत असल्याचे बघायला मिळणार आहे. त्यामुळे खामगावातील निवडणूकही अटीतटीची होणार आहे. मात्र अद्याप महाविकास आघाडीकडून सानंदा यांच्या नावाची घोषणा झालेली नाही. असे असले तरी सानंदा तयारीत आहेत.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!