देश / विदेश

Uttar Pradesh : तरूणाने आठ वेळा मतदान केले, व्हिडिओने गोत्यात आणले

Legal Action : तरुण सापडला कायद्याच्या कचाट्यात

Uttar Pradesh : लोकशाहीने प्रत्येकाला एक वेळा मतदानाचा अधिकार दिला आहे. मात्र एका तरुणाने तब्बल आठ वेळा मतदान केल्याचा दावा केला आहे. तसा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आठ वेळा मतदान करणारा खिरियाच्या पमरण गावचा रहिवासी आहे. त्याचं नाव राजन सिंह असून पोलिसांनी राजनला अटक केली आहे.

गेला महिन्याभरापासून लोकशाहीचा उत्सव सुरू आहे. लोकसभा निवडणुकीचे आतापर्यंत चार टप्पे झाले. तर लोकसभा निवडणुकांच्या पाचव्या टप्प्यात देशभरात मतदानाची प्रक्रिया आज पार पडत आहे. देशातील 49 जागांवर मतदान होत आहे. देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. तर नेत्यांकडून मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं जात आहे. दरम्यान सोशल मीडियावर एका तरुणाने आठ वेळा मतदान केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

पुन्हा मतदान घेण्याची मागणी

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर याप्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील एटामध्ये एका व्यक्तीने 8 वेळा मतदान केल्याचा दावा केला आहे. आता संबंधित मतदान केंद्रावर पुन्हा मतदान घेण्याची शिफारस निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. दरम्यान, मतदान करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या मतदान केंद्रावर पुन्हा मतदान घेण्याची शिफारस निवडणूक आयोगानं केली आहे. यासोबतच या व्यक्तीनं ज्या पोलिंग बुथवर मतदानाचा हक्क बजावला होता, त्या सर्व सदस्यांना निलंबित करण्यात आलं आहे. तसेच, उत्तर प्रदेशच्या उर्वरित टप्प्यातील सर्व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना मतदारांची ओळख पटवण्याच्या प्रक्रियेचं काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Maharashtra Lok Sabha Election : ठाण्यात ईव्हीएम मशीन बिघडले, मतदारांच्या रांगा

तरुणावर गुन्हा दाखल

दरम्यान घटनेची दखल घेत या तरुणावर एटा जिल्ह्यातील नयागाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. व्हिडीओमध्ये अनेक वेळा मतदान करताना दिसणारा व्यक्ती राजन सिंह, अनिल सिंह यांचा मुलगा असून, खिरिया पमरण गावातील रहिवासी असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

राजकीय नेत्यांनी केला पोस्ट व्हिडिओ!

राहुल गांधी यांनीही हा व्हिडीओ ट्वीट करत भाजपवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी ट्वीटमध्ये म्हणाले की, आपला पराभव समोर पाहून भाजपला जनादेश नाकारण्यासाठी सरकारी यंत्रणेवर दबाव आणून लोकशाही लुटायची आहे. निवडणुकीचे कर्तव्य बजावणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांनी सत्तेच्या दबावाला सामोरं जाताना आपली घटनात्मक जबाबदारी विसरू नये, अशी काँग्रेसची अपेक्षा आहे. अन्यथा, भारताचं सरकार स्थापन होताच, अशी कारवाई केली जाईल की, भविष्यात कोणीही ‘संविधानाच्या शपथेचा’ अवमान करण्यापूर्वी 10 वेळा विचार करेल. तर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. निवडणूक आयोगाला हे चुकीचं वाटत असेल तर काहीतरी कारवाई करावी, अन्यथा… भाजपची बूथ कमिटी ही खरे तर लूट कमिटी आहे, असंही लिहिलं आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!