Gondia News : गोंदिया लाचलुचपत विभागाकडून 7 मे रोजी गोरेगाव तहसील कार्यालायतील अधिकारी, कर्मचारी अशा 6 जणांवर कारवाई करण्यात आली. अशी चर्चा सुरू होती. ही कारवाई खरी असली तरी, प्रत्यक्षात 3 आरोपींविरुद्धच गुन्हा नोंद करण्यात आला असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे कारवाई पूर्ण होईपर्यंत लाचलुचपत विभागाने गुप्तता बाळगली आहे.त्यामुळे या कारवाईने महसूल प्रशासनात चर्चेला उधाण आले आहे
कारवाईमुळे एकच खळबळ
गोरेगाव तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक जोमात सुरू आहे. या गैरप्रकाराला प्रशासनाचे अभय असल्याच्या चर्चेला 7 मे रोजी लाचलुचपत विभागाच्या कारवाईने बळ मिळाले. गिधाडी येथील अवैध रेती वाहतूक प्रकरणात तहसीलदार व नायब तहसीलदार यांनी एका कंत्राटी कर्मचाऱ्याच्या माध्यमातून 1 लाखाची लाच मागितली. या प्रकरणाची शहनिशा करीत लाचलुचपत विभागाने तहसील कार्यालयातील लाचखोरांच्या टोळीवर कारवाई केली.या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात 3 आरोपींविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपींमध्ये तहसीलदार किशन भदाने, नायब तहसीलदार नागपुरे व कंत्राटी कर्मचारी राजन गणवीर यांचा समावेश आले आहे. उल्लेखनीय असे की, रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू असल्यामुळे लाचलुचपत विभागाकडून अधिकृतरित्या माहिती मिळाली नव्हती.
Split in Congress : मागाठाणे विधानसभा क्षेत्रात काँग्रेसला गळती
गिधाडी येथील एका वाहन धारकावर अवैध रेती वाहतूक प्रकरणी कारवाई न करण्यासाठी 1 लाख रुपयाची लाच मागितली होती. दरम्यान गोंदिया लाचलुचपत विभागाने या बाबीशी शहनिशा केली असता, तहसील कार्यालयात कार्यरत राजन गणवीर या कंत्राटी कर्मचाऱ्याच्या माध्यमातून तहसीलदार व नायब तहसीलदार यांनी लाच मागितल्याचे समोर आले. यावरून कारवाई करण्यात आली. आरोपी तहसीलदार किसन भदाने, नायब तहसीलदार नागपुरे व खाजगी व्यक्ती राजेंद्र गणवीर या तिघांविरुद्ध गोरेगाव पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.