महाराष्ट्र

Prakash Ambedkar : आयसीयूमधून प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केला धोका

Vanchit Bahujan Aghadi : निवडणुकीनंतर ओबीसी आरक्षण जाणार

Maharashtra Assembly Election : सध्या आयसीसूमध्ये उपचार घेत असलेल्या प्रकाश आंबेडकर यांनी निवडणुकीनंतर मोठा धोका निर्माण होणार असल्याचं भाकित केलं  आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील ओबीसी आरक्षण जाणार असल्याचं भाकित आंबेडकर यांनी व्यक्त केलं आहे. महाराष्ट्रात सध्या विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी मुख्य लढत पाहायला मिळणार आहे. अशात आंबेडकर यांच्या या विधानामुळं खळबळ उडाली आहे.

यापूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार दाऊद इब्राहिमला भेटल्याचा दावा केला होता. त्यामुळंही राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. निवडणुकीचा प्रचार जोरावर सुरू असताना आंबेडकर यांनी प्रकृती खालावली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्या हृदयात गुठळी असल्याचं आढळलं. त्यानंतर त्यांच्यावर अँजिओग्राफी आणि अॅन्जिओप्लास्टी करण्यात आली आहे. ते सध्या पुण्यातील एका रुग्णालयात उपचार घेत आहेत. वैद्यकीय प्रक्रिया पार पडल्यानंतर आंबेडकर यांचा एका व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे.

असा आहे दावा

वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत एक्सवर (ट्विटर) आंबेडकर यांचा व्हिडीओ शेअर करत मोठा दावा करण्यात आला आहे. ‘विधानसभेच्या निवडणुकीनंतर ओबीसींचं आरक्षण थांबवलं जाणार आहे’, असं प्रकाश आंबेडकर यांनी या व्हिडीओत म्हटलं आहे. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आरक्षणवादी कार्यकर्त्यांना वंचित बहुजन आघाडीच्या पाठिमागे उभं राहण्याचं आवाहन केलं आहे. आपल्या व्हिडीओत आंबेडकर म्हणाले की, ‘मी सध्या आयसीयूमध्ये आहे. अॅन्जिओग्राफी आणि अॅन्जिओप्लास्टी दोन्हीही झालेली आहे. ही निवडणूक खूप महत्त्वाची आहे. ओबीसीसाठी देखील महत्वाची आहे. कारण विधानसभेनंतर ओबीसींचं आरक्षण थांबवलं जाणार आहे.’

आंबेडकर पुढे म्हणाले की, ‘सीसीच्या आरक्षणाची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे ही निवडणूक महत्वाची आहे. या विधानसभेच्या निवडणुकीत आपले आमदार निवडून आले तर त्या ठिकाणी आरक्षणावरचा हल्ला थांबवता येईल. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांना, उमेदवारांना, आरक्षणवादी कार्यकर्त्यांना आवाहन करतो की आपण वंचित बहुजन आघाडीच्या पाठिमागे उभा राहा.’ वंचित बहुजन आघाडी प्रमुखाच्या या व्हिडीओनंतर राजकीय खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणुकीत संविधात रद्द करण्यात येणार असल्याचा प्रचार झाला. त्याचा फटका भाजपला बसला. आता महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी समाजात आरक्षणावरून आंदोलन सुरू आहे. अशात आंबेडकर यांच्या या दाव्यामुळं आणखी एक राजकीय पेच निर्माण होणार आहे. त्यामुळं याला महायुती कसं उत्तर देते हे पाहण्यासारखे राहणार आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!