विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील उत्कृष्ट संसदपटू आणि उत्कृष्ट भाषणांसाठीचे गेल्या सहा वर्षांमधील पुरस्कार एकाचवेळी जाहीर करण्यात आले. विधानसभेचा कार्यकाळ संपत आला असताना अखेर पुरस्कारांना मुहूर्त मिळाला. पुरस्कार जाहीर झाल्याचे फोन विधानमंडळ कार्यालयातून शनिवारी आमदारांना करण्यात आले. तसेच, त्यांना त्यासंबंधीचे पत्रही पाठविण्यात आले. लवकरच या पुरस्कारांचे समारंभपूर्वक वितरण करण्यात येणार आहे. विशेष बाब अशी की सहा वर्षांचे पुरस्कार एकाचवेळी देऊनही यादीमध्ये भंडारा-गोंदियातील एकाही आमदाराचा समावेश नाही. भंडारा-गोंदिया जिल्ह्यात स्वतः पुढे अनेक बिरुदं लावून शेकी मारणारे आमदार ‘उत्कृष्ट आमदार’ परीक्षेत मात्र नापास झाले आहेत.
विधिमंडळाच्या कामकाजा दरम्यान सभागृहातील आमदाराच्या कामाचे स्वरूप रेकॉर्ड केले जाते. हे रेकॉर्ड तपासून दोन्ही सभागृहातील सदस्यांमधून उत्कृष्ट संसदपटू आणि उत्कृष्ट भाषणांसाठीचे पुरस्कार दिले जातात. मात्र दुर्दैव असे की गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील एकही आमदाराला हा पुरस्कार मिळविता आला नाही. त्यामुळे जनतेचे प्रश्न विधानभवनात मांडतात कसे हाच प्रश्न निर्माण होत आहे.
यांचं होतय कौतुक
2018-19
उत्कृष्ट संसदपटू – बाळासाहेब थोरात (काँग्रेस), डॉ. संजय कुटे (भाजप), उत्कृष्ट भाषण : नरहरी झिरवळ (राष्ट्रवादी), पराग अळवणी (भाजप), विधान परिषद : उत्कृष्ट संसदपटू डॉ. नीलम गोहे (शिवसेना), निरंजन डावखरे (भाजप), उत्कृष्ट भाषण : हुस्नबानू खलिफे (काँग्रेस), सुजितसिंह ठाकूर (भाजप)
2019-20
विधानसभा : उत्कृष्ट संसदपटू – प्रकाश आबिटकर (शिवसेना), आशिष शेलार (भाजप), उत्कृष्ट भाषण – सुनील प्रभू (शिवसेना), दिलीप मोहिते पाटील (राष्ट्रवादी), विधान परिषद : उत्कृष्ट संसदपटू सतीश चव्हाण (राष्ट्रवादी), अनंत गाडगीळ (काँग्रेस), उत्कृष्ट भाषण: रामहरी रूपनवार (काँग्रेस), श्रीकांत देशपांडे (अपक्ष)
2020-21
विधानसभा : उत्कृष्ट संसदपटू अमित साटम (भाजप), आशिष जयस्वाल (अपक्ष), उत्कृष्ट भाषण : प्रताप सरनाईक (शिवसेना), प्रकाश सोळंके (राष्ट्रवादी), विधान परिषद : उत्कृष्ट संसदपटू – प्रवीण दरेकर (भाजप), विनायक मेटे (शिवसंग्राम), विधान परिषद : उत्कृष्ट भाषण – मनीषा कायंदे (शिवसेना), बाळाराम पाटील (शेकाप).
2021-22
विधानसभा उत्कृष्ट संसदपटू – संजय शिरसाट (शिवसेना), प्रशांत बंब (भाजप), उत्कृष्ट भाषण – सरोज अहिरे (राष्ट्रवादी), सिद्धार्थ शिरोळे (भाजप), विधान परिषद : उत्कृष्ट संसदपटू अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी), सदाभाऊ खोत (भाजप), उत्कृष्ट भाषण: गोपीकिशन बाजोरिया (शिवसेना), विक्रम काळे (राष्ट्रवादी).
2022-23
उत्कृष्ट संसदपटू – भरत गोगावले (शिवसेना), चेतन तुपे (राष्ट्रवादी), समीर कुणावार (भाजप), उत्कृष्ट भाषण – यामिनी जाधव (शिवसेना), अभिमन्यू पवार (भाजप), विधान परिषद: उत्कृष्ट संसदपटू – प्रसाद लाड (भाजप), महादेव जानकर (राष्ट्रीय समाज पक्ष), उत्कृष्ट भाषण – बाबाजानी दुर्रानी (राष्ट्रवादी), प्रद्मा सातव (काँग्रेस),
2023-24
उत्कृष्ट संसदपटू – विधानसभा रमेश बोरनारे (शिवसेना), अमिन पटेल (काँग्रेस), राम सातपुते (भाजप), उत्कृष्ट भाषण – कुणाल पाटील (काँग्रेस), श्वेता महाले (भाजप), प्राजक्त तनपुरे (राष्ट्रवादी), उत्कृष्ट संसदपटू विधान परिषद – अमोल मिटकरी (राष्ट्रवादी), गोपीचंद पडळकर (भाजप), रमेश पाटील (भाजप). उत्कृष्ट भाषण : आमशा पाडवी (शिवसेना), श्रीकांत भारतीय (भाजप), सुनील शिंदे (शिवसेना).