Nagpur Politics : नागपूर लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात आली. अधिकाऱ्यांनी केलेल्या छाननीअंती 26 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. एकूण 27 उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. वैध ठरलेल्या अर्जांमध्ये राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त पक्षांचे तीन उमेदवार, नोंदणीकृत राजकीय पक्षांचे 13 उमेदवार आणि 10 अपक्ष अशा एकूण 26 उमेदवारांचा समावेश आहे.
वैध उमेदवारांमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (भारतीय जनता पार्टी), योगीराज उर्फ योगेश पतीराम लांजेवार (बहुजन समाज पार्टी), आमदार विकास ठाकरे (इंडियन नॅशनल काँग्रेस), किवीनसुका सूर्यवंशी ( देश जनहित पार्टी), गरुदाद्री आनंद कुमार (अखिल भारतीय परिवार पार्टी), गुणवंत सोमकुवर ( भारतीय जवान किसान पार्टी), टेकराज बेलखोडे (बहुजन मुक्ती पार्टी), दीपक मस्के (बहुजन महा पार्टी), नारायण चौधरी (सोशलिस्ट युनिटी सेंटर ऑफ इंडिया कम्युनिस्ट), फहीम शमीम खान (माइनोरिटिज डेमोक्रेटिक पार्टी), विजय मानकर (आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया), विशेष फुटाणे (बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी), श्रीधर साळवे (भीम सेना), सुनील वानखेडे (राष्ट्र समर्पण पार्टी), सूरज मिश्रा (कुणबी बहुजन स्वराज्य पार्टी), ॲड. संतोष लांजेवार (ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॅाक), आदर्श ठाकूर (अपक्ष), ॲड. उल्हास दुपारे (अपक्ष), धानु वलथरे (अपक्ष), प्रफुऱ्ल भांगे (अपक्ष), बबिता अवस्थी (अपक्ष), विनायक अवचट (अपक्ष), सचिन वाघाडे (अपक्ष), साहिल तुरकर(अपक्ष), सुशील पाटील (अपक्ष), संतोष चव्हान (अपक्ष) यांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत.
नागपूर लोकसभा मतदारसंघात उमेदवारांना 30 मार्चपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. 19 एप्रिल रोजी नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. सध्या वैध असलेल्या अर्जांपैकी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांच्या थेट लढत होईल, असेच चित्र आहे. त्यातही नितीन गडकरी यांचा विजय व्हावा, यासाठी भाजपच्या सर्वच आघाड्यांनी कंबर कसली आहे. गडकरी यांच्या विजयासाठी सोशल माध्यमांवर वेगवेगळ्या पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत. भाजपलाही गडकरी यांनी केलेल्या कामांमुळे त्यांचा हमखास विजय होईल, असा ठाम विश्वास आहे