महाराष्ट्र

Lok Sabha Election : ‘सूर्य समुद्रात अस्त होत होता..’ गडकरींनी सांगितला किस्सा!

Nitin Gadkari : भाजपच्या स्थापना दिनानिमित्त सांगितल्या स्मृती

BJP Foundation Day : आजच्याच दिवशी सन १९८० ला भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली होती. मला आठवते… सर्व कार्यकर्ते मुंबईला जमलो होतो. ती संध्याकाळची वेळ होती आणि सूर्य अस्ताला चालला होता. सूर्याचा अस्त सुमुद्रात होताना आम्ही बघत होतो. अन् तेव्हा अटल बिहारी वाजपेयी बोलायला उभे झाले, अन् म्हणाले, ‘यह सूरज अस्त हो रहा है, यह फिरसे आयेगा. अंधेरा हटेगा और कमल खिलेगा…’ ही किस्सा नितीन गडकरी यांनी सांगितला.

शनिवारी (ता. 06) महायुतीचे उमेदवार आणि राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ गडकरी चंद्रपूर जिल्ह्याच्या राजुरा येथे आले होते. प्रचार सभेला संबोधित करताना ते म्हणाले की, 1980 मध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद फारशी नव्हती. पण कार्यकर्त्यांमध्ये जिद्द होती, उत्साह होता काहीतरी करून दाखवण्याचा आणि अटर बिहारी वाजपेयी यांच्या त्या भाषणाने प्रत्येक कार्यकर्ता पेटून उठला होता आणि त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांमध्ये भरलेल्या उत्साहाने काय करून दाखवले, हे आज देश पाहतो आहे.

Lok Sabha Election : सुधीर मुनगंटीवार म्हणाले गडकरींना, ‘आपका पिछा ना छोडुंगा..!

आजही काही धर्मांध शक्ती जाती-पातीचे राजकारण करून देशाच्या विकासाला खिळ घालण्याचे प्रयत्न करीत आहेत. पण या देशातील सुजाण लोक त्याला भिक घालणार नाहीत. कारण त्यांनी 10 वर्षांपूर्वीचा भारत देश पाहिला आहे आणि गेल्या 10 वर्षातील देशही पाहिला आहे. त्यामुळे जाती-धर्माच्या राजकारणाला यापुढे आपल्या देशात थारा मिळणार नाही. महाराष्ट्रात उत्तुंग कामगिरी केलेले सुधीर मुनगंटीवार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या राजकारणात येण्याची हाक दिली आहे. त्यामुळे आता मुनगंटीवार यांच्या कक्षा रुंदावणार आहेत. पूर्वी एकट्या चंद्रपूर जिल्ह्यापूरते मर्यादित असलेले मुनगंटीवार यांचे कार्य आता विस्तारणार आहे, असे नितीन गडकरी म्हणाले.

शरद जोशी यांचा मी एक अनुयायी आहे.त्यांच्या विचारांचा आधारावर एक जीवनदृष्टी तयार केली आहे. त्यांनी सांगितलेले की आपण ग्लोबल इकॉनॉमीमध्ये आहोत. साखरेचा भाव ब्राजील मध्ये ठरतो. मक्याचा भाव अमेरिकेत ठरतो. तेलाचा भाव मलेशिलियात ठरत असतो. त्यामुळे ‘ग्लोबल इकॉनॉमी’मध्ये ‘क्रॉप पटर्न’ विचारपूर्वक निवड केली पाहिजे, असे गडकरी म्हणाले. धानाचा तनसा पासून इंधन तयार करणार.जेव्हा राजुऱ्यात विमाने उतरतील तेव्हा शेतकऱ्यांनी तयार केलेले इंधन त्या विमानात जाईल असा विश्वास मी तुम्हाला सांगतो.तुम्हाला एकदम विश्वास बसणार नाही.मी फोकनाड बोलणारा नेता नाही, जो करता हू, वही बोलता हू, असे नितीन गडकरी म्हणाले आहेत.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!