महाराष्ट्र

Nitin Gadkari : पवार-गडकरी आज एकाच व्यासपीठावर!

Sharad Pawar : माजी आमदार देशमुखांचा अमृत महोत्सव समारोप सोहळा

Wardha : देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार आणि विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे एका व्यासपीठावर असणे ही एक राजकीय मेजवानी असते. दोघांची भाषणे आणि फटकेबाजी अनेक दिवस चर्चेचा विषय ठरत असते. आज (शनिवार, दि. १७) ही मेजवानी वर्धेकरांना प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे. तर संपूर्ण महाराष्ट्र हा कार्यक्रम नेत्यांच्या सोशल मीडियावर अॉनलाईन बघू शकणार आहेत. या कार्यक्रमात इतरही नेते मंडळी व्यासपीठावर असणार आहेत. पण पवार आणि गडकरी यांचे एकत्र असणे विशेष उत्सुकतेचा विषय ठरत असतो.

शरद पवार आणि नितीन गडकरी वर्षभरातून किमान एक-दोन कार्यक्रमांमध्ये तरी एका व्यासपीठावर असतातच. गेल्याच वर्षी पुण्यात दोघेही एका कार्यक्रमात एकत्र होते. 2021 मध्ये पालखी मार्गाच्या भूमीपुजनासाठी दोघे एकाच व्यासपीठावर होते. 2022 मध्ये पवारांच्या राजकीय राजकारणाला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने औरंगाबादमध्ये आयोजित कार्यक्रमालाही गडकरी उपस्थित होते. गेल्यावर्षी देखील पुण्यातील एका कार्यक्रमात दोघेही एका व्यासपीठावर होते.

आज (शनिवार) वर्धा येथे यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष तसेच माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख यांच्या अमृत महोत्सवाच्या समारोपीय सोहळ्याला दोघेही उपस्थित राहणार आहेत. वर्धा येथील यशवंत महाविद्यालयात दुपारी ३ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाची उत्सुकता फक्त वर्धा जिल्ह्यात नसून संपूर्ण महाराष्ट्रात आहे.

मुुख्य म्हणजे या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर शरद पवार आणि नितीन गडकरी यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील, खासदार अमर काळे यांचीही उपस्थिती राहणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी पवार आणि गडकरी एका व्यासपीठावर होते. आता निकालानंतर दोघेही प्रथमच एकत्र येत आहेत. त्यामुळे त्यांच्यासह इतर नेते काय भाषणं करतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

एकमेकांचं कौतुक करणारे नेते

शरद पवार आणि नितीन गडकरी हे दोघेही एकमेकांवर प्रेम करणारे नेते म्हणून महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या राजकारणात ओळखले जातात. दोघेही एकमेकांवर कधीही विखारी भाषणं करताना आढळली नाहीत. विशेषतः शरद पवारांनी तर कायम गडकरींचं कौतुकच केलं आहे. गडकरी मात्र खास त्यांच्या शैलीत टोमणा मारत असतात. काही दिवसांपूर्वीच प्रचारादरम्यान गडकरींनी केलेलं एक विधान गाजलं होतं. ‘शरद पवार जपानी बाहुलीसारखे आहेत. प्रत्येकाला वाटतं आपल्यालाच डोळा मारला’, असं ते म्हणाले होते.

‘तो’ गाजलेला कार्यक्रम

काही वर्षांपूर्वी शरद पवारांच्याच सत्कार सोहळ्यातील गडकरींचे भाषण खूप गाजले होते. ते भाषण आजही सोशल मीडियावर व्हायरल होत असतं. त्यात ‘शरद पवार नावाचं झाड खूप मजबूत आहे. त्याची मुळं खोलवर रुजली आहेत. ते झाड हलवलं तर सगळे मतदारसंघ इकडचे तिकडे हलून जातात,’ असं ते या भाषणात म्हणाले होते. शरद पवार म्हणजे दूरदृष्टी असलेला नेता असा उल्लेखही त्यांनी केला होता.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!