महाराष्ट्र

Lok Sabha Election : पुसदच्या सभेत नितीन गडकरी यांना भोवळ पण..

Yavatmal Washim Constituency : उष्णता मानामुळे त्रास झाल्याचा प्राथमिक अंदाज

BJP News : भरसभेत भाषणा दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा भोवळ आली आहे. राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ पुसदमध्ये आयोजित सभेत बोलत असताना गडकरी यांची प्रकृती अचानक बिघडली. अंगरक्षकांनी नितीन गडकरी यांना सावरले. जाहीर सभेत भाषण सुरु असताना नितीन गडकरी यांना भोवळ आली. पुसदच्या शिवाजी ग्राऊंडवर महायुतीकडून जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत भाषणाला उभे राहिलेल्या गडकरींना भोवळ आली. यावेळी त्यांच्या अंगरक्षकाने आणि मंचावरील इतर उपस्थितांनी त्यांना सावरले. 

महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारासाठी नितीन गडकरी यवतमाळमध्ये आले होते. विदर्भात उष्णतेची लाटही आहे. अशात महायुतीची सभा सुरु असताना नितीन गडकरी सभेला संबोधित करत होते, यावेळी त्यांना भोवळ आली होती. नितीन गडकरी यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती आहे. उन्हामुळे अनेक राजकीय नेत्यांना मोठी झळ बसताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांना भर सभेत चक्कर आल्याचाी घटना घडली होती. त्यानंतर आता गडकरी यांना भोवळ आली आहे. घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.

नितीन गडकरी यांना भर सभेत भोवळ येण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीदेखील त्यांना अनेकदा भोवळ आल्याची घटना घडली आहे. त्यानंतर आजही त्यांना भर मंचावर भाषण करत असताना भोवळ आली आहे. नितीन गडकरी यांना भोवळ आल्यानंतर त्यांच्या अंगरक्षकांनी त्यांना सावरले, अन्यथा ते जमिनीवर कोसळले असते. या घटनेमुळे यवतमाळमध्ये तारांबळ उडाली आहे. इतरांनी तातडीने गडकरी यांना पाणी देण्याचा प्रयत्न केला. यानंतर नितीन गडकरी यांना खुर्चीवर बसवण्यात आले. त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आलेत. यानंतर सभास्थळी ग्रीन रुममध्ये त्यांना बसवण्यात आले. त्यांची प्रकृती त्यानंतर स्थिर झाली.

Lok Sabha Election : मी जे बोलतो ते करुन दाखवतो

पुन्हा केले भाषण

नितीन गडकरी यांना भाषण करत असताना अचानक भोवळ आल्यामुळे मंचावर असलेले पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्त्यांचा काळजाचा ठोका चुकला होता. पण नितीन गडकरी आता त्यातून सावरले आहेत. त्यांची प्रकृती चांगली झाली. विशेष म्हणजे नितीन गडकरी यांनी थोडासा आराम केल्यानंतर ते पुन्हा भाषणासाठी व्यासपीठावर आले. त्यांनी जोरदार भाषण केले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!