महाराष्ट्र

Nitin Gadkari : भर लोकसभेत म्हणाले, लाजेने मान खाली घालावी लागते 

Lok Sabha : केंद्रीय मंत्र्यांनी व्यक्त केली खंत 

Parliament Winter Session : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आपल्या रोखठोक बोलण्यासाठी ओळखले जातात. भाषणादरम्यान नितीन गडकरी यांनी केलेली अनेक विधाने चर्चेत आली आहेत. गुरुवारी (12 डिसेंबर) लोकसभेमध्ये बोलताना नितीन गडकरी यांनी अशाच एका मुद्द्यावर बेधडकपणे प्रतिक्रिया व्यक्त केली. 

संसदेचे हिवाळी अधिवेशन सध्या नवी दिल्लीत सुरू आहे. अनेक मुद्द्यांवर या अधिवेशनामध्ये वादळी चर्चा होत आहे. गुरुवारी लोकसभेमध्ये देशभरातील वाहतूक सुरक्षा आणि अपघातांच्या मुद्द्यावर चर्चा झाली. यावेळी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी आकडेवारीसह आपली बाजू लोकसभेमध्ये मांडली. यावेळी गडकरी यांनी देशांमध्ये वाढत असलेल्या अपघातांच्या मुद्द्यावर चिंता व्यक्त केली.

कठोर व्हावे लागेल 

नितीन गडकरी म्हणाले की, जगभरातील देशांमध्ये जेव्हा वाहतूक नियम आणि अपघातात बद्दल चर्चा होते, त्यावेळी मान खाली घालावी लागते. भारतामध्ये वाहतूक नियम मोडणाऱ्यांची संख्या मोठी आहे. नियमांचे काटेकोरपणे पालन न केल्याने होणाऱ्या अपघातांची आकडेवारी देखील चिंता करायला लावणारी आहे. त्यामुळे विदेशांमध्ये जेव्हा या विषयावर चर्चा होते, त्यावेळी भारताची आकडेवारी चिंताजनक दिसून येते.

वाहन चालवण्याचा परवाना देताना अत्यंत कठोरपणे निर्णय घ्यावा लागेल, अशी वेळ आता आली आहे. वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या चालकांविरुद्ध कारवाई करताना देखील अत्यंत कठोरपणे पाऊले उचलण्याची गरज आता निर्माण झाली आहे. देशामध्ये रस्त्यांचा दर्जा सुधारला आहे. त्यामुळे वाहनांच्या सरासरी वेगामध्येही वाढ झाली आहे. वाहनांच्या वेगामध्ये वाढ होत असताना नियमांची पायमल्ली देखील होत आहे. त्यामुळे अपघाताच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे.

मोटार वाहन कायद्यामध्ये काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने बदल केले होते. त्यानुसार वाहतूक नियम मोडणाऱ्या चालकांविरुद्ध दंडाच्या रकमेमध्ये वाढ करण्यात आली होती. देशभरातील अनेक शहरांमध्ये दुचाकी चालकांना हेल्मेट वापरणे शक्तीचे करण्यात आले आहे. चार चाकी वाहन चालकांसाठी सीटबेल्ट देखील अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र त्यानंतरही अनेक वाहन चालकांकडून नियमांची पायमल्ली होत असल्याबद्दल गडकरी यांनी चिंता व्यक्त केली.

Nitin Raut : विटंबनेचा मुद्दा कायदेशीर पद्धतीने हाताळणार

उपायांची गरज 

देशातील रस्ते अपघातांची संख्या पाहता मोठ्या प्रमाणावर उपाय करावे लागणार आहे. या संदर्भातील कार्यवाहीला केंद्र सरकारने सुरुवात केली आहे. मात्र केवळ कारवाई करून काही होणार नाही. देशभरातील वाहनचालकांमध्ये नियमानबद्दल जागरूकता आणि काटेकोरपणा निर्माण होणे देखील गरजेचे झाले आहे. त्याशिवाय अपघातांची संख्या नियंत्रणात आणली जाऊ शकत नाही, असे नितीन गडकरी म्हणाले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!