Bangladesh Crises : बांगलादेशमध्ये अद्यापही राजकीय अस्थिरता कायम आहे. यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राऊत यांच्या प्रतिक्रिया नंतर भाजप नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना नव्या नावाची उपाधी बहाल केली आहे. ही उपाधी बहाल करत राणे यांनी उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि शिवसेनेवर टीका केली आहे.
‘जिहाद हृदयसम्राट’ अशी उपाधी नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना दिली आहे. बांगलादेशातील हिंदू समाजाची काळजी वाटत असल्याबद्दल नितेश राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. बांगलादेशमध्ये असलेल्या आमच्या हिंदू माता-भगिनी आणि बांधवांची काळजी उद्धव ठाकरेच्या प्रवक्त्याला वाटणं हे हास्यास्पद आहे. शिवसेनेचे उमेदवार मुस्लिम मतांमुळे निवडणून आले आहेत, असे नितेश राणे म्हणाले.
मुल्लांसोबत वेळ
शिवसेना उद्धव ठाकरे गटाने निवडणुकीच्या काळात वेळ कोणासोबत घालवला हे सगळ्यांना ठाऊक आहे. मुल्लांसोबत सगळा वेळ घालून ठाकरे यांनी आपली प्रतिमा मलीन करून घेतली आहे. त्यातला एक टक्का वेळ देऊळ आणि साधू संतांना दिला नाही. संजय राऊत गोधडित असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप, हिंदू समाजाची सुरक्षा आणि काळजी घेत होते. हिंदू समाजाची काळजी जेवढी संघाकडून घेतली जाते तेवढी काळजी संजय राऊत यांचा मालक घेत नाही, अशी टीकाही नितेश राणे यांनी केली.
विधानसभेची निवडणूक सुरू असताना मतदानवेळी शिवसेनेला मतदान करावं असा फतवा काढण्यात आला होता. बांगलादेश मधील परिस्थिती इंदिरा गांधींपेक्षा मोदींनी चांगल्या प्रकारे हाताळली. नरेंद्र मोदी यांच्यामुळे जगातला हिंदू समाज आज सुरक्षित आहे. भांडूपमध्ये बसून आंतराष्ट्रीय पातळीची चिंता करु नका, असा टोलाही नितेश राणे यांनी शिवसेनेला लगावला. हिरव्या सापांना दूध पाजण्याचे काम उद्धव ठाकरेंनी केले आहे. मोदींचं नाव घेतलं की, अनेक जिहादी अतिरेकी थरथर कापतात. याचा अनुभव संजय राऊत यांना लवकरच येईल, असेही राणी म्हणाले.
Sudhir Mungantiwar: मूलमधील धान खरेदीसाठी दोन नोंदणी केंद्र वाढवा
काँग्रेसच्या काळातील भारत आता राहिलेला नाही. मोदींच्या काळातील हिंदुस्थान तयार आहे. हिंदुंना सर्वात जास्त धोका जिहादी हृदयसम्राट उद्धव ठाकरेकडून आहे. पदासाठी लाचारी करणाऱ्यांनी दुसऱ्यांना पदाबाबतचे सल्ले देऊ नये. अधिवेशनानंतर तुझ्या सोबत किती आमदार राहतात ते बघ, असं नितेश राणे म्हणाले. त्यामुळे पुन्हा एकदा नितेश राणे विरुद्ध शिवसेना असे शाब्दिक युद्ध रंगण्याची चिन्हे आहेत.