प्रशासन

Bhandara : कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रशिक्षण सत्राचा ओव्हरडोज

Assembly Election : जिल्हाधिकाऱ्यांनी दिला समन्वयाचा मंत्र

Collector Dr. Sanjay Kolte : नव्याने आलेले भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांचे आगामी निवडणुकी संदर्भात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सत्र सुरु झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यामार्फत कर्मचाऱ्यांना समन्वयाचे धडे दिले जात आहेत. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विविध विभागांसोबत समन्वयाने काम करावे. तसेच निवडणुकीच्या दरम्यान सोपविलेली जबाबदारी व कर्तव्याचे काटेकोर पालन करावे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचा अनुभव गाठीशी घेऊन निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे यावेळी अधिक जबाबदारीने पालन करून योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.संजय कोलते यांनी केले. 

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात भंडारा-गोंदिया जिल्ह्यासाठी एकत्रित एक दिवसाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या उद्घाटन सभारंभात जिल्हाधिकारी डॉ. कोलते बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी आशा पठाण, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रशांत पिसाळ, जिल्ह्यातील सर्व क्षेत्रीय अधिकारी, नोडल अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सूचनेचे पालन..

निवडणूक आयोगातर्फे निवडणुकीसंदर्भात विविध प्रकारच्या सूचना वेळोवेळी दिल्या जातात. या सूचना संदर्भात कोणाला शंका असल्यास त्या संदर्भातील समाधान हे निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्या जाते. तंत्रज्ञानात होणारे बदल लक्षात घेता निवडणूक विभागातर्फे संकेतस्थळावर येणाऱ्या सूचना व त्याची अंमलबजावनी सर्वांनी दक्षतेने करावी, निवडणुकीच्या कामासंदर्भात कोणताही चुका सहन केल्या जात नाहीत. जाणिवपूर्वक जर कोणी चुका केल्या तर अशा व्यक्तीविरूद्ध कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. प्रशिक्षणाचे प्रास्ताविक उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रशांत पिसाळ यांनी केले.एकूण 5 सत्रामध्ये हे प्रशिक्षण देण्यात आले. यात भूसंपादन सहायक आयुक्त भूसंपादन शिल्पा सोनाले, उपविभागीय अधिकारी चंद्रकांत खंडाईत, उपजिल्हाधिकारी संपत खलाटे, उपविभागीय अधिकारी तुमसर दर्शन निकाळजे यांनी मार्गदर्शन केले.

पुन्हाने तोच डोज

विशेष म्हणजे भंडारा जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा निवडणुकीचा डोज मिळाला आहे. यापूर्वीचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी निवडणुकीच्या संदर्भात कर्मचाऱ्यांचे निवडणुकीचे सत्र यापूर्वीच घेतले आहे. आता नव्याने आलेल्या जिल्हाधिकारी संजय कोलते यांनी पुन्हा एकदा निवडणुकीच्या प्रशिक्षणाचे सत्र आयोजित केल्याने कर्मचाऱ्यांना ओवरडोज झाल्याचे बोलले जात आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!