Correct Timing : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुणे दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली. या टिकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सुपारीबाज लोकांनी अजितदादांबद्दल बोलू नये, अशा शब्दात मिटकरींनी ठाकरे यांना सुनावले आहे. पुणे येथील पूरपरिस्थितीची पाहणी केल्यानंतर राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात पावसामुळे पूरस्थिती निर्माण झालेल्या भागाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी टीकेचे बाण सोडले.
ठाकरे यांनी नुकसानाचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्य सरकारवर टीका केली. पाणी सोडताना लोकांना सांगायला हवे होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जाणार, याची कल्पनाही लोकांना नव्हती. पुण्यातील परिस्थितीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घातले पाहिजे. पुण्याचे पालकमंत्री येथे नसतानाही पुण्यात धरण वाहिले, अशी टीका राज ठाकरे केली.
दादांचे समर्थक चिडले
अजित पवार यांच्यावर टीका केल्यानंतर दादांचे समर्थक अमोल मिटकरी चिडले. त्यांनी राज ठाकरे यांचा समाचार घेता. मिटकरी म्हणाले, सुपारीबाज लोकांनी अजितदादांबद्दल बोलू नये. टोलनाके किंवा भोंग्याचे आंदोलन हे यशस्वी करु शकले नाहीत.
अशा लोकांनी अजितदादांबद्दल बोलू नये. त्यांची विश्वासार्हता संपलेली आहे. त्या माणसाला एनडीआरएफचा ‘लॉंगफॉर्म’ माहित नाही. जनतेने त्यांना नाकारले आहे. ठाकरे यांचे नाव न घेता मिटकरी यांनी ही टीका केली आहे. दिलेला शब्द पाळणाऱ्या अजितदादांबद्दल सुपारी बहाद्दर बोलू शकत नाही. राज्याच्या राजकारणात ते सर्वांत अयशस्वी ठरले आहेत. अजित पवार यांच्यावर टीका करणे म्हणजे सूर्याला वाकोल्या दाखवणे आहे.
OBC Reservation : केंद्राच्या यादीतील लोधी समाजचा मार्ग मोकळा
ठाकरे यांनी टीका करताना पुण्याची पाच शहरे झाली आहे असे म्हटले होते. एक अधिकारी निलंबित करुन काही होत नाही. पुण्यातील परिस्थितीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनीही लक्ष घातले पाहिजे. सध्या महाराष्ट्रात जे चालू आहे, ते अत्यंत दुर्देवी आहे. महाराष्ट्रात फक्त मतांसाठी राजकारण सुरू आहे. पण हे महाराष्ट्रासाठी चागले लक्षण नाही. यासर्व गोष्टीचा विचार राजकारण्यांनी केला पाहिजे. तुमच्यात काय मतभेत असतील किंवा काय मतदान करुन घ्यायचे असेल ते करा. पण अशा प्रकारे जाती-जातींमध्ये विष कालवून जर मतदान मिळवित असाल तर महाराष्ट्राचे भविष्य चांगले नाही, असे राज ठाकरे यांनी म्हटले होते