महाराष्ट्र

Amol Mitkari : प्रकाश आंबेडकर यांनी महायुतीत यावे

Mahayuti : आमदार अमोल मिटकरींकडून पुनरुच्चार

Maharashtra Politics : राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्य राजकीय नेत्यांकडून करण्यात येत आहे. अकोल्याचे विधान परिषद आमदार अमोल मिटकरींनी पुन्हा वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांना महायुतीत येण्याचं आवाहन केलं आहे. मिटकरी यांनी पुन्हा एकदा आंबेडकरांना साद घातली आहे. त्यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

विधानसभा निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते. अशातच मिटकरी यांनी यांनी पुरोगामी विचारांच्या लोकांनी एकत्र यावं, असं वक्तव्य केलं आहे. मिटकरी यांनी यापूर्वीही अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर यांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते. मात्र त्याला दोन्ही नेत्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नव्हता. वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली होती.

वंचित’ची अट

अजित पवार गट जोपर्यंत भाजप युतीमधून बाहेर पडत नाही, तोपर्यंत कोणताही विचार केला जाऊ शकत नसल्याचे रेखा ठाकूर यांनी म्हटलं होतं. त्यामुळे या चर्चेला पूर्णविराम मिळाला होता. आता पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिटकरींनी हे विधान केले आहे. मिटकरी यांच्या या विधानावर वंचित बहुजन आघाडीकडून आता कोणती प्रतिक्रिया येते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महाविकास आघाडीतर्फे प्रकाश आंबेडकर यांना लोकसभेच्या निवडणुकीत सन्मान दिला गेला नाही. काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत या दोघांनीही प्रकाश आंबेडकर यांचा सन्मान ठेवला नाही. अशात आपण प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन त्यांना महायुती येण्यासाठी आमंत्रण देणार असल्याचं देखील मिटकरी यांनी म्हटलं आहे.

Eknath shinde : प्रकाश आंबेडकर यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र!

स्पष्टीकरण..

राज्याच्या कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार उठून गेल्याची चर्चा होती. यावर मिटकरी म्हणाले की, अजितदादा नाराज नाहीत. महाविकास आघाडी आणि शरद पवार गटाकडून जाणीवपूर्वक अशा अफवा पेरल्या जातात. मंत्रिमंडळ बैठकीत उपस्थित असलेले काही अधिकारी माध्यमांना अशा बातम्या जाणीवपूर्वक देतात. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. असा कोणताही प्रकार घडलेला नाही. कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीतून अजित पवार निघून गेल्याची चर्चा होती. यावरून विरोधकांनी टीका टिप्पणी सुरू केली होती. यासंदर्भात महायुतीमधील अनेक नेत्यांनी आतापर्यंत स्पष्टीकरण दिले आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!