महाराष्ट्र

NCP : सरकारला टार्गेट करण्यासाठी गडकरींच्या व्हिडीओचा वापर

Jitendra Awhad : केंद्रीय मंत्र्यांच्या व्यक्तीगत मताचा केला वापर

Criticized BJP : मोफत योजनांसंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलेल्या व्यक्तीगत मताचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून वापर करण्यात आला आहे. गडकरी यांचा एक जुना व्हिडीओ ट्विट करीत आव्हाड यांनी महायुती (Mahayuti) सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्रात अलीकडेच सरकारचे विविध योजनांची घोषणा केली आहे. त्यातून महिला, बेरोजगार, शेतकरी यांना अनेक लाभ विनामूल्य मिळणार आहे. या योजनांवर आव्हाड यांनी टीका करण्यासाठी गडकरींच्या व्हिडीओचा वापर केला आहे.

 

नितीन गडकरी यांनी फार पूर्वी आपले व्यक्तीगत मत सांगताना अशा मोफत योजनांमुळे सरकारी तिजोरीवर भार पडत असल्याचे म्हटले होते. अशा योजनांमुळे नेहमीच राजकारण होऊ शकत नाही, असेही ते म्हणाले होते. नेमक्या त्यांच्या याच व्हिडीओचा आधार घेत आव्हाड यांनी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीच्या महायुती सरकारला गडकरींनी घरचा अहेर दिल्याचे नमूद केले आहे. लवकरच महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक (Assembly Election) होणार आहे. त्यामुळे सरकारने घोषणांचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली आहे.

एकापाठोपाठ योजना

अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली आहे. त्यातून महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळणार आहेत. वारकऱ्यांसाठी पेन्शन योजनाही लागू करण्यात आली आहे. शेतीचे वीजबिल माफ करण्यात आले आहे. त्यानंतर आषाढी एकादशीच्या दिवशी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बेरोजगार तरुणांना थेट आर्थिक लाभ देणारी योजना जाहीर केली आहे. एसटीमध्ये महिलांना प्रवासावर सवलत आधीपासून सुरू आहे. सरकारच्या या सर्व योजनांवर टीका करण्यासाठी आव्हाड यांनी गडकरींच्या व्यक्तीगत मताचा आधार घेतला आहे.

IAS Puja Khedkar : मनोरमा खेडेकरला फिल्मी स्टाईल अटक!

अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेची घोषणा केल्यानंतर लाडका भाऊ योजनाही जाहीर करा अशी मागणी महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांनी केली होती. त्याला मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर विरोधी पक्षाने आता या सर्वच योजनांवर टीका सुरू केली आहे. निवडणूक डोळ्यापुढे ठेवत सर्व योजना जाहीर केल्याचे काँग्रेस नेते (Congress) बाळासाहेब थोरात यांनी नमूद केले. शरद पवार (Sharad Pawar) गटाकडूनही सरकारला लक्ष्य करण्यात आले. यासाठी गडकरी यांचा वापरण्यात आलेला व्हिडीओ एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमधील आहे.

गडकरी यांनी या मुलाखतीत सरकारी पैशातून वाटल्या जाणाऱ्या मोफत गोष्टींवर तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. त्यावेळी गडकरी असे म्हणाले होते की, देशातली वीज मंडळ 18 लाख कोटी रुपयांनी तोट्यात आहेत. देशात वीज मोफत देण्याची स्पर्धा कायम राहिली, तर वीज उत्पादनावर परिणाम होईल. देशात मोफत मिक्सर वाटप, इडली वाटप, इडली पात्र वाटप होत आहे. याबद्दलही त्यांनी नापसंती व्यक्त केली. रोजगार निर्माण, गरीबांसाठी घरकूल, कचरामुक्त राष्ट्र, नवीन उद्योग निर्मिती, अशा उपायांची गरज असल्याचेही गडकरी म्हणाले होते. मोफत रेवडी वाटल्याने देशाचे नुकसान होईल. अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होईल, असेही गडकरी यांनी नमूद केले. आता गडकरी यांच्या याच प्रतिक्रियेचा वापर महाविकास आघाडीकडून सरकारच्या विरोधात केला जात आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!