Sambhaji Raje : विशाळगडावरील दंगलीमागे संभाजीराजेंचा हात असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद आव्हाड यांनी केला. ठाण्यात वाहनावर झालेल्या हल्ल्यानंतर संतापलेल्या आव्हाड यांनी संभाजीराजे यांच्यावर गंभीर आरोप करण्यास सुरुवात केली आहे. माझ्या गाडीवर झालेल्या हल्ल्याला मी अजिबात घाबरत नाही. असल्या भ्याड हल्ल्याला घाबरुन मी माझ्या धर्मनिरपेक्षतेच्या विचाराशी तडजोड करणार नाही, असे आव्हाड म्हणाले.
विशाळगडावर झालेल्या घटनेनंतर स्वत: तुमच्या वडीलांनी म्हणजेच शाहू महाराजांनी तुमचा निषेध करणे हे बेदखल करण्यासारखे आहे. त्यामुळे संभाजीराजेंवर आता मी अधिक द्वेषाने व त्वेषाने बोलणार. मुळात वडील खासदार झाल्याने संभाजीराजेंच्या मनात आग आहे, अनेक पक्षांकडे गेल्यानंतर यांना तिकीट नाकारले म्हणून संभाजीराजे हे अशा प्रकारचे वागत आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली. संभाजी राजे यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांशी गद्दारी केलेली आहे, असे आव्हाड म्हणाले.
दुसऱ्यांना मदत केली
संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला केला. यात आव्हाड यांच्या ताफ्यातील सर्वात मागच्या गाडीवर दगडफेक झाली. या घटनेनंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन छत्रपती संभाजीराजे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. हा हल्ला झाला, तेव्हा माझ्याकडे पोलिसांच्या चार रिव्हॉल्वर म्हणजेच 24 गोळ्या होत्या. पोलिसांनी प्रतिहल्ला केला असता तर काय झाले असते, असा धमकीवजा इशाराही आव्हाड यांनी दिला आहे. मुळात गजापुरवर हल्ला केला. तेव्हा त्या ठिकाणी काय फक्त मुस्लिम राहतात असे नाही. हिंदू देखील राहतात. या घटनेत मुख्य आरोपी म्हणून संभाजीराजे आहेत, असेही आव्हाड म्हणाले.
संभाजी राजे यांनी हे थेट घडविलेले नाही. परंतु संभाजी राजे यांच्या मदतीमुळे संभाजी भिडे यांच्या लोकांनी ही दंगड घडविल्याचेही आव्हाड म्हणाले. खासदार छत्रपती शाहू महाराज यांना देखील विशाळगडावर घडलेली घटना पटलेली नाही. आव्हाड यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावरही टीका केली. महाराष्ट्राला एवढा मोठा बहुरूपी कलाकार मिळाला. त्यांचे कानटोप्या घातलेले, गॉगल लावलेले फोटो काढूनही ठेवले होते. आधारकार्डावर अजित अनंतराव पवार असे असेल तेच नाव बोर्डिंग पासवर हवे. दुसरे नाव छापलेच कसे, ज्या एअरलाइन्सने दिले त्यांच्यावरही गुन्ह्यात नोंदवा, असे आव्हाड म्हणाले.