महाराष्ट्र

Akola Mahayuti : का हो? अमोलभाऊ कुठे दिसले का?

Assembly Election : निवडणुकीच्या प्रचारात मिटकरींना करताहेत सगळेच ‘मिस’

Maharashtra Politics : राज्यभरात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचार शिगेला पोहोचला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत विजयासाठी रस्सीखेच सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील सर्व पक्षातील नेते प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. नेत्यांच्या प्रचार सभांचा धुराळा सर्वत्र उडत आहे. अकोल्यात तर एकापाठोपाठ प्रचारसभा घेतल्या जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी अकोल्यात येऊन गेले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही मतदारांना साद घातली. या सगळ्या धावपळीतून दादांची सावली मात्र पाहिजे त्या प्रमाणात दिसेनाशी आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी म्हणजे अजित पवार यांची अकोल्यातील ढाल. दादांबद्दल कोणी चकार शब्दही काढला, तरी विधान परिषदेचे आमदार असलेल्या मिटकरींचा पारा चढतो. दादांबद्दल बोलणाऱ्यांना मिटकरी क्षणाचाही विलंब न लावता चोख प्रत्युत्तर देतात. अजितदादांची अकोल्यातील हिच तोफ सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अकोल्यात काहीशी शांत आहे. हिच चर्चा सध्या महायुतीत आहे. राष्ट्रवादीत फूट पडण्यापूर्वी अजित पवार महाविकास आघाडीत होते. त्यावेळी आघाडीनं भाजपला चांगलंच घेरलं.

भाऊंचे हल्ले

अजितदादा महाविकास आघाडीत असताना आमदार अमोल मिटकरी यांनी अकोल्यात भाजपवर जबरदस्त शाब्दिक हल्ले केले. भाजपला घेरण्याची कोणतीही संधी मिटकरी यांनी सोडली नाही. मात्र अचानक घड्याळीचे काटे फिरले. राजकारणात ‘वक्त ने करवट बदली’ असं घडलं. अजित पवार भाजपसोबत आलेत. महायुतीनं त्यांना उपमुख्यमंत्री पद दिलं. दादा महायुतीत आले म्हटल्यावर त्यांची सावलीही महायुतीत आली.

महायुतीत आल्यावर अमोल मिटकरी यांनी तेच केलं जे त्यांना करायला हवं होतं. महायुतीचा धर्म त्यांनी पाळला. मात्र त्यानंतरही अजितदादांबद्दल कोणी चकार शब्द जरी काढला, तरी मिटकरी यांनी अशांना सडेतोड उत्तर दिले. मात्र अजित पवार यांच्याप्रती असलेली निष्ठा, पक्षाप्रती असलेले कर्तव्य निभावणारे मिटकरी त्यांच्या गृहजिल्ह्यात प्रचारात फारसे दिसत नसल्याची चर्चा आहे.

Amol Mitkari : स्वार्थासाठी जिथे गगण ठेंगणे.. ते महाभाग डॉ. राजेंद्र शिंगणे!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या दिवशी आमदार मिटकरी व्यासपीठावर होते. त्यापूर्वी पूर्णवेळ ते अजित पवार यांच्या प्रचारासाठी दादांचा मतदारसंघ पिंजून काढत होते. पवारांच्या मतदारसंघातून परतल्यानंतर मिटकरी तन-मन-धनाने पक्षाच्या कामात व्यस्त आहेत. त्यामुळंच ते अकोला जिल्ह्यातील मतदारसंघात वेळ देऊ शकत नसल्याचं बोललं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असल्यानं अमोल मिटकरी आपल्या पक्षाप्रती असलेलं आपलं कर्तव्य अत्यंत चोखपणे निभावत आहेत. मात्र अकोला जिल्ह्यातील प्रचारात दादांची ही ढाल आणि राष्ट्रवादीची तोफ अनेकजण ‘मिस’ करीत आहेत.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!