महाराष्ट्र

Sunil Tatkare : दादा, भुजबळांच्या नेतृत्वात विकासाचा संकल्प 

Sanman Yatra : प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचे प्रतिपादन

NCP News : लोकांच्या हिताची कामे करायची असतील तर सत्तेत राहणे गरजेचे आहे. जनहितार्थ अजित पवार, छगन भुजबळ, प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वाखाली महायुतीसोबत राष्ट्रवादी काँग्रेस गेली आहे. राज्यातील जनतेच व्यापक हित जपत विकास करण्याचा निर्णय सर्वांनी घेतला आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले. नाशिक जिल्ह्यातील (Nashik) येवला येथील राधा कृष्ण लॉन्स येथे सन्मान यात्रा सभेत ते बोलत होते.

महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष, सूरज चव्हाण, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम, सामाजिक न्याय प्रदेशाध्यक्ष सुनिल मगरे, अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष इद्रिस नाईकवाडे, जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे आदी उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे म्हणाले की, अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली एक नवीन भूमिका घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वावरत आहे. यशवंतराव चव्हाण यांचे विचार पुढे घेऊन जाण्याचे काम केले जातं आहे. फुले, शाहू, आंबेडकरांच्या समतेच्या विचारांवर आपण वाटचाल करीत आहोत. 

कामे करण्यासाठी सत्ता जरूरी

सत्तेत सहभागी होऊन राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या विचारांवर कायम आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची वैचारिक भूमिका तुसभरही बदललेली नाही. बळीराजाच्या विकासासाठी सत्तेत राहणे महत्वाचे आहे. छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली येवल्यासह नाशिक जिल्ह्यात हजारो कोटी रुपयांची विकास कामे करण्यात येत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली यापुढेही विकासाची कामे होतील. महायुती (Mahayuti) सरकारच्या माध्यमातून अनेक महत्वपूर्ण विकास कामे आपण केली आहे. येणाऱ्या निवडणुकीत कुठलीही लाट नाही. केलेल्या विकास कामांना जनतेचा पाठिंबा असणार आहे, असे तटकरे यांनी नमूद केले.

शेतकऱ्यांच्या मनात राग असल्याने त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत बसला. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी वचनबद्ध आहोत. महिला, युवक, शेतकरी यांच्यासह विविध घटकांसाठी कोट्यवधी रुपयांच्या योजना सुरू केल्या आहेत. अनेक धाडसी निर्णय अजित पवार यांनी घेतल्याने विरोधकांना धडकी भरली आहे. त्यामुळे अपप्रचार करण्याचा प्रयत्न होत आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी दोन महिन्यांचे पैसे माता भगिनीच्या खात्यात जमा होतील. राष्ट्रवादीची जनसंवाद यात्रा लवकरच महाराष्ट्र भर काढण्यात येणार आहे. जनतेचे व्यापक हित जपण्याचे काम करण्यात येणार आहे. राज्याचा विकास करण्याचा निर्णय अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहे. विविध विकास कामांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास निर्माण करण्यासाठी जनसंवाद यात्रा निर्माण येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!