Assembly Election : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. गुरुवारी (7 नोव्हेंबर) सकाळी त्यांचे नागपुरात आगमन झाले. महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना येत्या 20 नोव्हेंबरला रंगणार आहे. त्या अनुषंगाने प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. शरद पवार यांनी देशाची सुरक्षा आणि कायदा याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
महायुती सरकार व निशाणा साधत या निवडणुकीत महाविकास आघाडी नक्की विजय होईल, असा विश्वास पवारांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वांत मोठा पक्ष आहे. या पक्षाच्या विचारधारेवर स्वातंत्र्यानंतर सरकार चालत राहिली आहे. विदर्भातील विकास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हातून झाला. यानंतर आघाडी तयार झाली. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी लढणार आहे. या सर्व गोष्टीचा प्रभाव निकालानंतर दिसेल, असेही शरद पवार म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दुनेश्वर पेठे पूर्व नागपूर मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. या अनुषंगाने महाविकास आघाडीचे नेते मंडळी त्यांचा प्रचारार्थ सभेसाठी आले होते. महाविकास आघाडीचे शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची जाहीर सभा झाली. या जाहीर सभेत माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख, आमदार अभिजित वंजारी, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, आमदार विकास ठाकरे, मध्य प्रदेशचे काँग्रेसचे कमिटीचे राकेश रेड्डी प्रकाश गजभिये यांच्यासह वरिष्ठ नेते मंडळी उपस्थित होते.
राजकरण नाही
नागपुरातील सहाही जागा महाविकास आघाडीच्या आल्या पाहिजे, असे मत आमदार विकास ठाकरे यांनी व्यक्त केले. शिवसेना पक्षाचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कोणताही कार्यकर्ता निवडणुकीत उमेदवार म्हणून असला, तरी त्याला काँग्रेसतर्फे पूर्णपणे पाठिंबा राहील. काँग्रेस पक्षाचे ‘प्लॅनिंग’ सुरू आहे. काँग्रेसचे नेते कामाला लागलेले आहेत. कितीही मोठी रॅली काढा, कितीही सभा घ्या, परंतु मतदारांना महायुतीची सवय माहित आहे, असेही विकास ठाकरे म्हणाले.
पूर्व नागपूर महाविकास आघाडीचे उमेदवार दुनेश्वर पेठे यांनी शरद पवार आणि महाविकास आघाडीचे आभार मानले. शरद पवार ज्या ठिकाणी गेले, त्या ठिकाणचे सोने होते. पवारांनी उमेदवारी दिली. विजय झाला तर तो सगळ्यांचा असेल. प्रामाणिकपणे काम करेल. आपल्या मतदारसंघात 15 वर्षापासून भाजपचे आमदार आहेत. या आमदारांनी नागरिकांचे हाल केले. हे लोकांना ठाऊक आहे. जनतेचे प्रश्न समस्या सोडविण्यासाठी आपण तत्पर राहणार असल्याचं ते म्हणाले.
देशमुखांचे आरोप
अनेक वर्षांपासून पूर्व नागपुरातील मतदारसंघात काँग्रेसची जागा होती. काँग्रेस पक्ष असताना पूर्व नागपुरात उद्योग होते. परंतु भाजपचे पदाधिकारी आल्यापासून नागपुरातील उद्योग दिसेनासे झालेत. येणारे उद्योग कधी आलेच नाहीत. तरुणांना रोजगार देण्यासाठी उद्योगांची आवश्यकता असते. महायुती सरकारने आणि मुख्यतः भाजपने मोठे नुकसान केल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केली.