Nagpur Blast : काल 13 जून रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास नागपूर नजीकच्या चारमुंडी या स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, कंपनीचं छत संपूर्णपणे कोसळलं. या दुर्घटनेत एकूण सहा जणांचा मृत्यू झाला. तर तीन कर्मचारी जखमी झाले. जखमींवर उपचार सुरू आहेत.
घटनास्थळी काल ता. (ता. 13) सर्वप्रथम माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख पोहोचले आणि बचावकार्य केले. त्यानंतर आज (ता. 14) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे आणि सुनील केदार यांनी भेट दिली. नितीन गडकरी तेथे पोहोचले तेव्हा अनिल देशमुखसुद्धा होते. त्यांनी गडकरींना घटनेची सविस्तर माहिती दिली.
फडणवीस यचा दावा
स्फोट झाल्यानंतर जखमींना नागपुर येथील सेनगुप्ता हॉस्पिटलमध्ये भरती केले होते. त्या ठिकाणी सेनगुप्ता हॉस्पिटलकडून पैसे मागण्यात आले. जखमींच्या नातेवाईकांनी ते पैसे दिले. दोन हजार रुपये दिले त्याची पावतीही आहे. असे अनिल देशमुख यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस म्हणतात आमचे प्रशासन लक्ष देत आहे. हा कुठला लक्ष देण्याच प्रकार आहे, असा सवालही देशमुख यांनी केला. तेथे प्रशासन आणि कंपनीचे अधिकारी असतानाही पैसे घेऊ नका असे हॉस्पीटल प्रशासनाला कुणी सांगितले नाही, असेही ते म्हणाले.
Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर म्हणाले, भाजप नागनाथ तर काँग्रेस सापनाथ !
कारखानदार खेमका यांनी उपचाराचा सर्व खर्च द्यायला पाहिजे होता, पण दिला नाही. मृतकांच्या नातेवाईकांना खेमका यांनी 50 लाख तर राज्यसरकारने 25 लाख रुपये दिले पाहिजे. या स्फोटाची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. वारंवार अश्या घटना घडत असतात. दोषींवर कारवाई झालीच पाहिजे. सरकारने अशा कारखानदारांना सोडता कामा नये, असेही अनिल देशमुख म्हणाले.
पुण्यातील अपघात प्रकरण
ही दुर्घटना झाल्यावर मी दहा मिनिटांत पोहोचलो. कंपनीची अॅम्ब्यूलन्स उपलब्ध नव्हती. आम्ही फोन करून बाहेरून अॅम्ब्यूलन्स बोलावल्या. कंपनीच्या मालकालाही बोलवलं, पण ते आले नाही. त्यामुळे कंपनी मालक खेमकाची चौकशी करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे, असे सांगत त्यांनी पुणे हिट अॅंड रन प्रकरणावरही भाष्य केले. ते म्हणाले. पुणे पोर्शे वाहन अपघात प्रकरणात आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलले गेले आहे.
आता मृतकांना आरोपी दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आरोपीला कठोर शिक्षा न होता मृतकाना दोषी दाखवले गेले तर ते चुकीचे होईल. एखादा पोलिस अधिकारी वरच्या दबावाखाली व्हिसेरा पॉझिटिव्ह करण्यासाठी प्रयत्न करत असेल तर योग्य नाही. तो अधिकारी कोण आहे, हेदेखील सर्वांना माहिती आहे, असेही अनिल देशमुख यांनी सांगितले.