महाराष्ट्र

Assembly Elections : अजितदादा विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवणार?

NCP Politics : मिटकरींच्या विधानाने रंगली चर्चा

Political News : महायुतीतल्या तिन्ही पक्षांनी 100 जागांची मागणी ताणून धरली, तर प्रत्येकाला निवडणूक वेगळी लढावी लागेल. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी हे मोठं विधान केलं आहे. एकप्रकारे त्यांनी स्वबळाची शक्यताच वर्तविली आहे. मिटकरी म्हणाले, महायुतीत जर आम्हाला 55 जागा मिळत असतील, तर त्यात आम्ही समाधानी असणार नाही.

https://whatsapp.com/channel/0029VaUpEJn7YSd10QyUIR35

आमदार अमोल मिटकरी यांनी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाच्या पार्श्वभूमीवर हे मोठं विधान केले आहे. मिटकरींच्या विधानानंतर अजित पवार विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार का? याची चर्चा होऊ लागली आहे. आमदार अमोल मिटकरी हे अकोल्यात बोलत होते.

लोकसभा निवडणुकीच्या नंतर आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीकडे सर्वच पक्षांनी फोकस केले आहे. लवकरच जागा वाटपावर चर्चा होणार आहे. तर जागावाटपात योग्य जागा न मिळाल्यास अनेकांकडून स्वबळाचा नारा देण्याची शक्यता आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना पुन्हा रंगणार आहे. मात्र जागावाटपावर हे गणित अवलंबून असणार आहे. त्यामुळे आतापासूनच नेत्यांकडून जागांवर दावा करण्यात येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते आमदार अमोल मिटकरी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, राज्यातील 288 जागांपैकी राष्ट्रवादीकडे आज 43 आमदार आहेत. आम्हाला 55 मतदारसंघ भेटले तर आम्हाला ते आमच्या अपेक्षेपेक्षा फार कमी असतील.

Manoj Jarange Patil : छगनभाऊ..तुझा असा इंगा जिरवतो..

छगन भुजबळ यांनी जी 80 ते 100 जागा लढवायची मागणी केली आहे. ती मागणी आमची कायम आहे. अकोला आणि वाशीम जिल्ह्यात सात जागा मिळाव्यात अशी महायुतीकडे आमची मागणी राहील असेही मिटकरी म्हणाले.

बाळापूर विधानसभा मतदारसंघासाठी संदीप पाटील उमेदवार असल्याचेही ते म्हणाले. तसेच मूर्तिजापूर, बाळापूर हे आमचे कोट्यातील जागा आहेत. त्यामुळे आमचा दावा असणारच. शरद पवार यांचे वक्तव्य संभ्रम निर्माण करणारे आहे. सर्व आमदार अजितदादा सोबत आहेत. त्यांच्याकडे कोणताही आमदार जाईल अशी कोणतीही शक्यता नसल्याचं मिटकरी म्हणाले. त्यांच्याकडे सक्षम नेते नसल्यामुळे ते असे बोलत आहेत, असा टोलाही मिटकरींनी लगावला.

दरेकर, शिरसाट यांना आवरा

आमदार अमोल मिटकरी यांच्या तोंडाला आवर घालण्याची गरज असल्याचे विधान आमदार प्रवीण दरेकर यांनी केले होते. यावर आमदार अमोल मिटकरी यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेनेचे संजय सिरसाट आणि भाजपचे प्रवीण दरेकर यांच्या बोलण्यावर त्या त्या पक्षांनी लगाम घातला पाहिजे व महायुतीत विसंवाद निर्माण होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे, असे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!