महाराष्ट्र

Mahayuti : महायुतीतील धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर!

Amol Mitkari : आता मिटकरींची मुख्यमंत्री शिंदेंकडे 'ही' मागणी!

Maharashtra Politics : गेल्या काही दिवसांपासून महायुतीतील नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये काहीशी धुसफूस आणि संघर्ष पाहायला मिळत आहे. आता पुन्हा एकदा ही धुसफूस चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळालं. बारामतीत शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखांनी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्याचे बॅनर, कमानी शहरात लावल्या. मात्र अजित पवारांनी या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला पाठ फिरवली. 

अजित पवारांनी कार्यक्रमाला जाण्याचं टाळल्यानंतर त्यांच्या काळा कापड टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. यावर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे महायुतीत वितुष्ट निर्माण करणाऱ्या वक्तव्यांना आवर घालण्याची मागणी केली आहे. आपण एकत्र लढायचे की नाही, याचाही खुलासा करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यानंतर सातत्याने सत्ताधारी महायुतीमध्ये धुसफूस आणि संघर्ष पाहायला मिळत आहे. आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. असे असताना आता महायुतीतील नेत्यांकडून एकमेकांना लक्ष्य करण्याचा प्रकार सातत्याने समोर येत आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. त्यातल्या त्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लक्ष केलं जातं असल्याचं अनेक वेळा समोर आलं आहे.

बारामतीमध्ये मंगळवारी (ता. 10) रोजी शिवसेनेच्यावतीने एकनाथ गणेश फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या कमानी विविध ठिकाणी बारामती शहरात लावण्यात आल्या. त्यामध्ये एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे फोटोही लावण्यात आले. बारामती शिवसेनेच्यावतीने एकनाथ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला अजित पवार न आल्याने जिल्हाप्रमुख सुरेंद्र जेवरे यांनी अजित पवारांच्या फोटोवर काळं कापड टाकलं.

News Districts : नवीन जिल्ह्यासाठी नव्या सरकारची वाट बघावी लागणार ?

सुरेंद्र जेवरे यांनी हा प्रकार केल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. सुरेंद्र जेवरे हे शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख आहेत. अजित पवारांना तीन ते चार वेळा कार्यक्रमाला येण्यासाठी विनंती केली. मात्र अजित पवारांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. अजित पवार एकनाथ फेस्टिवलला आले नाहीत. त्यामुळे अजित पवारांच्या फोटोवर काळा कापड टाकला. अजित पवारांचा निषेध केला. त्यानंतर पोलिसांनी सुरेंद्र जेवरे यांना ताब्यात घेतले.

आमदार मिटकरींची प्रतिक्रिया

काही कार्यक्रम आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून आयोजित करण्यात आले होते. मुख्यमंत्री आले नाहीत म्हणून आम्ही त्यांच्या फोटोवर काळं कापड टाकलं नाही, असंही मिटकरी म्हणाले. बारामतीचा विकास अजित दादांनी केला आहे. ज्यांनी आज आगाऊपणा केला. एकनाथ शिंदेंनी त्याला योग्य ती समज द्यावी, असे मिटकरी म्हणाले. अमित शाह यांना भेटायला अजित दादा गेले होते. जागावाटप किंवा मुख्यमंत्रिपदाबद्दल काहीही चर्चा झाली नसल्याचं मिटकरींनी सांगितलं.

error: Content is protected !!