Prepration For Assembly Election: भंडारा जिल्ह्यातील तुमसर मध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची जन सन्मान यात्रा झाली. शनिवारी (28 सप्टेंबर) यात्रेमुळे तुमसर गुलाबी झाले. यात्रेनंतर आयोजित सभेत बोलताना केलेल्या भाषणात अजित पवार तुमसरवासियांना मोठा ‘वादा’ करून गेले. त्यांच्या या वाद्याचा (Promise) फायदा आमदार राजू कारेमोरे यांना होणार का, अशी चर्चा रंगली आहे.
अजित पवार म्हणाले की, तुमसरच्या जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसला प्रेम दिले आहे. याची परतफेड आमदार राजू कारेमोरे (MLA Raju Karemore) यांनी केली आहे. सत्तेच्या तीन वर्षाच्या कालावधीत तुमसर-मोहाडीच्या जनतेसाठी राजू कारेमोरे यांनी तीन हजार कोटी रुपयांचा निधी खेचून आणला आहे. लोकांनी पुन्हा एकदा आगामी विधानसभा निवडणुकीत राजू कारेमोरे यांना विजयी करावे. पाच वर्षाच्या हिशोबाने पाच हजार कोटी रुपयांचा निधी आपण स्वत: तुमसर-मोहाडी देऊ.
केलेल्या कामांचा पाढा
पवार म्हणाले की, आपण लाडक्या भाऊ-बहिणींसाठी काय केले सांगायला आलो आहोत. आपण तुमसरच्या विकासाला प्राधान्य दिले आहे. भंडारा जिल्ह्यासाठी पाच वर्षात भरपूर काम केले आहे. सव्वादोन कोटींचे रस्ते बांधले आहेत. तुमसरसाठी 930 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात (Maharashtra Budget) करण्यात आली आहे. तुमसर उपजिल्हा रुग्णालयाला 200 खाटांचे रुग्णालय दिले. मोहाडीला 100 खाटांचे रुग्णालय दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने महिलांना राजकारणात मोठं केलं आहे. राजकारणातील अनेक मोठी पदं महिलांना दिली आहेत.
Prakash Ambedkar : जागा वाटपाचे काम आम्ही आंबेडकरांना दिलेले नाही, त्यामुळे..
लाडक्या बहिणीला प्रेमापोटी आर्थिकदृष्टीने स्वावलंबी बनविले आहे. यंदाचे रक्षाबंधन त्यांना स्मरणात राहिल. आपण मी खोटं बोलणार नाही. आपण एकतर शब्द देत नाही. दिलेला शब्द फिरवत नाही. अजित दादाचा वादा पक्का असतो. विरोधक म्हणतात, आम्ही सत्तेत आल्यावर अजित दादांची योजना बंद करू. कोणतीही योजना चालावी असे वाटत असेल, तर महायुतीला (Mahayuti) विजयी करावे. लाडक्या बहिणींना 29 सप्टेंबरला तिसरा हप्ता मिळेल, असेही अजित पवार म्हणाले.
विरोधकांच्या पोटात दुखायला लागने आहे. बहिणीच फक्त लाडक्या. भाऊ वाऱ्यावर सोडले, अशी ओरड विरोधक करीत आहेत. मात्र आमच्या भावांसाठीही विविध योजना आणल्या आहेत. भाऊ आणि बहिणींनी सत्ता विरोधकांच्या हातात दिली तर काहीच मिळणार नाही. सगळ्या योजना बंद होतील. सरकार महायुतीच्या हातात राहिली तर राज्याचा निधी तर मिळेलच पण केंद्र सरकारचा निधीही मिळेल. विरोधक सत्तेवर आले तर सगळेच बंद होईल. महाराष्ट्र अनेक वर्ष मागे जाईल, असेही अजित पवार म्हणाले.