महाराष्ट्र

Sanjay Raut : आघाडीत बिघाडी, काँग्रेस, राष्ट्रवादीचा कामात भोपळा

Shiv Sena : खासदार संजय राऊत यांचा गंभीर आरोप

Mahavikas Aghadi : लोकसभा निवडणुकीत शिवसेना 21 जागांवर लढली. त्यातील सांगलीतील जागेवर काँग्रेस-राष्ट्रवादीने कामच केले नाही. त्यामुळे आम्ही 20 जागाच लढलो. ठाणे, कल्याण डोंबिवलीत संपूर्ण शासकीय प्रशासकीय यंत्रणा विरोधात काम करत होती. केंद्राकडून सगळ्यात जास्त टार्गेट आम्हाला करण्यात आले. त्याचा फटका आम्हाला बसला. त्यामुळे ‘स्ट्राइक रेट’ हा विषय कोणी सांगू नये. आम्ही तीनही पक्ष एकत्रित लढलो. तिघांचा एकत्रित ‘स्ट्राइक रेट’ चांगलाच आहे. केंद्र सरकारने सगळ्यात जास्त शिवसेनेला टार्गेट केले. त्याचा फटका उमेदवारांना बसला, असा आरोप संजय राऊत यांनी केला. ते नाशिक येथे ते पत्रकारांशी बोलत होते.

https://whatsapp.com/channel/0029VaUpEJn7YSd10QyUIR35

अशा 100 पेक्षा जास्त जागा आहेत, ज्यात भाजप 500 ते 1 हजार 500 मतांच्या फरकाने जिंकली आहे. त्यातील बहुसंख्य जागा प्रशासनावर दबाव आणून विजयी करून घेण्यात आल्या आहेत. धुळ्याची जागा विजयी घोषित करावी, असा दबाव केंद्राचा होता. तेथील प्रशासनावर त्यांचा वॉच होता. शेवटी ती जागा काँग्रेसने जिंकली. 60 ईव्हीएम मशिनची मोजणी बाकी असताना विजयी घोषित करा, यासाठी भाजपा नेते प्रयत्नात होते. धुळ्याची जागा भाजप लुटण्याच्या प्रयत्नात होती. परंतु काँग्रेसच्या सतर्कतेमुळे पुन्हा मोजणी झाली. त्यात काँग्रेसचा विजय झाला.

अक्षरश: ‘कॅप्चरिंग’

सुमारे शंभरपेक्षा अधिक जागा मोदी-शाह जोडीने भाजपकडे ओरबाडल्या आहेत. सरकार अस्थिर आहे. ज्यादिवशी हे सरकार कोसळेल तेव्हा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर पहिली कारवाई होईल, असा इशारा संजय राऊतांनी दिला. महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे. या यशानंतर महाविकास आघाडीत शरद पवार आक्रमक झाले आहे. महाविकास आघाडीत आमचा ‘स्ट्राइक रेट’ जास्त आहे.

Sudhir Mungantiwar : ‘योद्धा वही हैं बड़े, जो हर हाल में लड़े’

आम्ही जास्त जागा लढवायला हव्या होत्या. परंतु आघाडीत बिघाड होऊ नये, म्हणून दोन पावले मागे आलो, असे शरद पवार यांनी म्हटले. त्यांना खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिले.

संजय राऊत म्हणाले की, शरद पवार यांचा ‘स्ट्राइक’ जास्त हे खरे आहे. पण सांगलीच्या जागी काँग्रेसने काम केले नाही. या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने काम केले नाही. दुसरीकडे केंद्र सरकारने सगळ्यात जास्त आम्हाला टार्गेट केले. त्याचा फटका शिवसेनेच्या उमेदवारांना बसला. शरद पवार विधानसभेसाठी जास्त जागा म्हणजे किती घेतील? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

हेलिकॉप्टर मध्ये 20 कोटी

विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघाची निवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक दौरा केला. त्यावर संजय राऊत यांनी टीका केली. मुख्यमंत्री येऊन गेले. ते कशासाठी येतात हे माहिती आहे. शेअर बाजाराप्रमाणे भाव लावला जातो. शिक्षकांना विकत घेऊ नका. परंपरा मोडू नका, असे संजय राऊत यांनी म्हटले. पैसे वाटपाचा व्हिडीओ सुषमा अंधारे यांनी ट्विट केला आहे. त्यावर राऊत म्हणाले, हेलिकॉप्टरमधून 20 कोटी उतरवले हे दिसत आहे.

पदवीधर शिक्षक वर्गात बाजारात ओढले जात आहे. उघड्या डोळ्यांनी व्यभिचार पाहिला जात आहे. लोकशाहीची हत्या होत आहे. निवडणूक आयोग धृतराष्ट्राप्रमाणे हे सर्व पाहात आहे. दिंडोरीत भगरे नावाचा उमेदवार उभा केला. भास्कर भगरे यांच्या नावाप्रमाणे हा उमेदवार दिला. त्याला पिपाणी चिन्ह दिले. लोकांना फसवणूक करुन मत घेतली जात आहे, अशी टीकाही राऊत यांनी केली.

error: Content is protected !!