महाराष्ट्र

Shrad Pawar : वन नेशन, वन इलेक्शन काय घेणार?

NCP : महाराष्ट्रातील निवडणूक विलंबावरून शरद पवार यांचा टोला

One Nation One Election : एक राष्ट्र, एक निवडणूक या सरकारच्या आग्रही मागणीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले. पवार सध्या विदर्भाच्या दौऱ्यारव आहेत. शनिवारी (ता. 17) त्यांनी नागपुरात प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी निवडणुकीच्या विषयावर आपले मत व्यक्त केले. केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी (ता. 17) दोन राज्यातील विधानसभा निवडणूक जाहीर केली. यात जम्मू काश्मीर आणि हरियाणा या दोन राज्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेचा कार्यकाळ लवकरच संपणार आहे. मात्र या दोन्ही राज्यांची निवडणूक जाहीर करणे आयोगाने टाळल्याचे पवार म्हणाले.

पवार म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सातत्याने एक देश एक निवडणूक या विषयावर बोलतात. मात्र देशातील यंत्रणा एकाच वेळी तीन राज्यांची निवडणूकही घेऊ शकत नाही. जम्मू आणि काश्मीरात विधानसभेच्या 90 जागा आहेत. हरियााणाात देखील 90 जागांसाठी निवडणूक होत आहे. या दोन राज्यातील 180 जागा आणि महाराष्ट्राच्या 288 अशा एकत्रित 468 जागांवर जर यंत्रणा निवडणूक घेऊ शकत नसेल तर देशात एकच निवडणूक कशी घेणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

शांतता बिघडवू नका

शेजारी असलेल्या बांगलादेशात अस्थिरता पसरली आहे. मात्र दुसऱ्या देशात निर्माण झालेल्या परिस्थितीवरून आपल्या देशातील शांतता बिघडविणे चुकीचे असल्याचे पवार म्हणाले. राज्यात आणि देशात शांतता कायम राहिल यासाठी सर्वांनी सर्वसमावेशक प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही पवार म्हणाले. बांगलादेशात सत्ता परिवर्तन झाले आहे. तेथे मोठ्या प्रमाणात उठाव झाला आहे. त्यावरून देशात अनेक ठिकाणी प्रतिक्रिया उमटत आहेत. यासोबतच पश्चिम बंगालमध्ये जो प्रकार घडला. त्यामुळेही संताप व्यक्त होत आहे. परंतु या साऱ्यात राज्यातील शांतता बिघडणार नाही, हे लक्षात घेणे गरजेचे असल्याचेही पवार म्हणाले.

महाराष्ट्रात काही ठिकाणी चुकीच्या घटना घडल्या आहेत. या घटना राज्याच्य हिताच्या नाहीत. या घटना कशामुळे घडल्या यासंदर्भात आपण खोलात जाणार नाही. परंतु महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था कायम अबाधित राहावी, असे आपल्याला वाटते. राज्यात सर्वत्र शांतता नांदावी, असे सगळ्यांना वाटत आहे. राजकीय आणि सामाजिक या दोन्ही क्षेत्रातील लोकांनी शांततेसाठी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही पवार म्हणाले. विधानसभा निवडणुकीपूर्वी पवार सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी देखील पवार चर्चा करणार आहेत.

error: Content is protected !!