महाराष्ट्र

Navneet Rana : नवनीत राणा यांचे संघम शरणम!

Amravati : सरसंघचालक मोहन भागवत यांचे घेतले आशीर्वाद

RSS :  लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या नवनीत राणा यांनी आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळीक वाढविली आहे. त्यांच्या ‘संघम् शरणम्’चा प्रयत्य रविवारी आला. अमरावती AMRAVATI जिल्ह्यातील कोंडेश्वर – भानखेडा रोडवरील महानुभाव आश्रमाला शंभर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित शतकपूर्ती सोहळ्याला सरसंघचालक मोहन भागवत यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी माजी खासदार नवनीत राणा यांनी त्यांची भेट घेत आशीर्वाद घेतले. 

अमरावती–कोंडेश्वर भानखेडा रोडवरील महानुभव आश्रमाच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त 20 ते 22 डिसेंबर यादरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या शतकपूर्ती सोहळ्यामध्ये देशभरातून संत, महंत उपस्थित झाले होते. रविवारी सरसंघचालक मोहन भागवत यांनीदेखील या सोहळ्याला भेट दिली. यावेळी महानुभाव आश्रम शतकपूर्ती सोहळा समितीच्या वतीने परमपूज्य कारंजेकर मोहनदास बाबा यांच्या हस्ते मोहन भागवत व नवनीत रवी राणा यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

गाठीभेटी

लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यापासून राणा यांनी भाजपमधील नेत्यांच्या गाठीभेटी वाढविल्या आहेत. विशेष म्हणजे, संघाशी त्यांनी साधलेली जवळीक कोणापासूनही लपून राहिलेली नाही. विधानसभा निवडणुकीच्या काळातही त्यांनी भाजप नेत्यांच्या भेटीगाठीवर भर दिला होता. त्यांच्या उमेदवारीला विरोध करणाऱ्या भाजप नेत्यांनी विधानसभा निवडणुकीत त्यांचे पती आमदार रवी राणा MLA RAVI RANA यांना महायुतीने पाठिंबा देण्यावरून प्रचंड विरोध केला होता. विशेष म्हणजे, भाजपचे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी यात आघाडीवर होते. काहींनी तर थेट त्यांच्या विरोधात भूमिका घेत बडनेरा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीही दाखल केली होती.या प्रचंड विरोधानंतरही रवी राणा विजय झालेत. त्यानंतर रवी राणा यांना मंत्रिपद मिळावे यासाठीही प्रयत्न झालेत. त्यावरी रवी राणा यांच्यासोबत प्रत्येक भेटीला नवीन राणा या सोबतच होत्या.

Eknath Shinde : सत्ता आल्यावर शिंदे स्वस्थ; पक्ष अस्वस्थ!

जवळीक

भाजपशी जवळीक साधण्यासाठी संघाची शिडी राणा दाम्पत्याने भाजपसोबत जवळीक साधण्यासाठी संघाच्या शिडीचा वापर केल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी संघाच्या कोणत्याही उपक्रमात राणा दाम्पत्य पुढाकार घेत सहभागी होताना दिसते. खासदारकीची दुसरी टर्म हुकल्यानंतर आता पती रवी राणा यांच्यासाठी मंत्रिपद खेचून आणण्यासाठी नवीन राणा संघाच्या शिडीचा कसा उपयोग करून घेतात, हे येणाऱ्या काळात दिसून येईलच.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!