Way For Rajya Sabha : राज्यात विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. अशात राजकीय वर्तुळात एका नवीन चर्चेला उधाण आले आहे. नुकत्याच लोकसभा निवडणूक पराभूत झालेल्या भाजप नेत्या नवनीत राणा पुन्हा खासदार होणार, अशी शक्यता वर्तविली जात आहे. नवनीत राणा यांची लवकरच राज्यसभेवर वर्णी लागणार, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात होत आहे. अमरावतीत नवनीत राणा पुन्हा खासदार होणार, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. अमरावतीत राणा दाम्पत्याने आयोजित केलेल्या दहीहंडी कार्यक्रमात बावनकुळे उपस्थित होते.
बडनेराचे (Badnera) आमदार रवी राणा म्हणाले की, नवनीत राणा लोकसभा निवडणुकीत विजयी होऊन भाजपच्या खासदार झाल्या पाहिजे. त्यासाठी बावनकुळे यांनी खूप मेहनत घेतली. चंद्रशेखर बावनकुळे यांची फार इच्छा होती की, नवनीत राणा आणि आपण भाजपात प्रवेश केला पाहिजे. परंतु आपण कधीच भाजपात जाणार नाही. अमरावती येथे राणा दाम्पत्यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी कार्यक्रमात चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित होते. बावनकुळे म्हणाले की, राणा दाम्पत्याच्यावतीने अमरावती जिल्ह्यात दरवर्षी दहीहंडी कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात येते. लोकसभा निवडणुकीदरम्यान अमरावती मतदारसंघात थोडा अपघात झाला.
कमी मतदान
बावनकुळे म्हणाले, अमरावती जिल्ह्यातील काही बुथवर पाच मते कमी मिळाली. जर ती पाच मतं प्रत्येक बुथवर मिळाली असती तर नवनीत राणा यांना खासदार झाल्या असत्या. आपल्याला माहिती आहे की, जोपर्यंत नवनीत राणा भाजप आणि महायुतीच्या खासदार होणार नाही, तोपर्यंत त्या थांबणार नाहीत. नवनीत राणा खासदार होणारच आहेत. अमरावतीकरांनी याची अजिबात काळजी करू नये. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. आगामी काळात नवनीत राणा यांची राज्यसभेवर वर्णी लागणार, असा अंदाज लावण्यात येत आहे.
Chandrapur Congress : उमेदवारीच्या संभाव्य दाव्यामुळे निलंबन
2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविली होती. त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) पाठिंब्याने अमरावतीच्या खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी शिवसेनेचे (Shiv Sena) उमेदवार आनंदराव अडसूळ यांना पराभूत केले होते. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा भाजपच्या उमेदवार म्हणून खासदारकी रिंगणात होत्या. परंतु नवनीत राणा यांना विजय प्राप्त झाला नाही. अमरावतीच्या जनतेने नवनीत नारायण यांना नाकारले. काँग्रेसचे (Congress) उमेदवार बळवंत वानखेडे यांना विजयी केले. भाजपच्या हातून अमरावती सारखा मोठा मतदारसंघ निसटला. हा पराभव भाजपला चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे भाजपने नवनीत राणा यांना राज्यसभेवर घेण्याची तयारी सुरू केली आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.