Navneet Rana Vs Asaduddin Owaisi : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात असदुद्दीन ओवैसी आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्यात एका विधानावरून चांगलाच वाद रंगला होता. आता नवनीत राणा यांनी पुन्हा असदुद्दीन ओवैसी यांच्या विरोधात तक्रार केली आहे. आता, खासदार ओवैसींच्या या शपथविधीच्या व्हिडिओवरुन त्यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी केली जात आहे. नवनीत राणा यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून ही मागणी केली आहे. ओवैसींकडून भारतीय संविधानाचे उल्लंघन झाल्याचंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे.
https://whatsapp.com/channel/0029VaUpEJn7YSd10QyUIR35
लोकसभा निवडणुकीमध्ये माजी खासदार तथा भाजप नेत्या नवनीत राणा यांनी प्रचारादरम्यान हैदराबाद मध्ये खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या विरोधात विधान केले होते. त्यानंतर दोघांमध्ये प्रचारा दरम्यान चांगलाच वाद रंगला होता. आता पुन्हा एकदा नवनीत राणा यांनी असदुद्दीन ओवैसींच्या शपथविधीवरुन त्यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून असदुद्दीन ओवैसींनी शपथ घेतल्यानंतर ‘जय पॅलेस्टाईन’ म्हणत केलेल्या घोषणेस राणा यांनी आक्षेप घेतला आहे.
भारतीय संविधानाच्या कलम 102/103 नुसार असदुद्दीन ओवैसी यांची खासदारकी रद्द करण्यात यावी, असे त्यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. ओवैसी यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेताना, जय पॅलेस्टाईनचा नारा देत आपली शपथ पूर्ण केली होती. त्यामुळे, देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी ही घातक बाब आहे. त्यांनी शपथ घेताना भारतीय संविधानाचे उल्लंघन केल्याचा आरोप राणा यांनी पत्रातून केला आहे. नवनीत राणा यांच्या पत्रामुळे असदुद्दीन ओवैसी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
संविधानाचे उल्लंघन
अठराव्या लोकसभेच्या कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी खासदार म्हणून शपथ घेतली. त्यांनी संसदेत शपथविधी सोहळ्यात ‘जय पॅलेस्टाईन’ म्हणत वाद निर्माण केला.
Chandrapur Congress : पक्षविरोधी कारवाया भोवल्या; देवतळे यांचे निलंबन
प्रोटेम स्पीकर यांनी अससुद्दीन ओवैसी यांना लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेण्यासाठी बोलावले. बिस्मिल्लाचे पठण करून ओवैसी यांनी खासदार म्हणून शपथ घेतली. खासदार म्हणून शपथ घेताना त्यांनी ‘जय भीम, जय तेलंगणा’ आणि नंतर ‘जय पॅलेस्टाईन’च्या घोषणा दिल्या. त्यानंतर भाजप खासदारांनी संसदेत गदारोळ सुरू केला होता. सोशल मीडियातूनही त्यांच्या या शपथेवर टीका करण्यात आली. आता नवनीत राणा यांच्या पत्रानंतर आता राष्ट्रपती काय भूमिका घेतात हे पाहावे लागणार आहे.