Bhandara Gondia Loksabha : आज 19 एप्रिलला देशात पहिल्या टप्प्यात मतदान होत आहे. पहिल्या चरणात भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. दरम्यान सकाळी सात वाजता पासून मतदानाला सुरुवात झाली. यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी कुटुंबासह मतदान केले. पटेल प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, महाराष्ट्रात महायुतीचे उमेदवार बहुसंख्येने निवडून येतील. मोदींच्या बाजूने कौल दिसत आहे.
सध्या देश बदललेला आहे. देश सुशिक्षित आणि तरुणांचा आहे. या मतदारांना मोदीच हवे आहेत. जनतेचा कौल मोदींच्या म्हणजेच महायुतींच्या बाजूने आहे असा विश्वास प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला. बारामती असो की महाराष्ट्र बहुसंख्य जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आम्ही महाविकास आघाडीत असताना कोणी किती काम केले हे आम्हाला माहित आहे.नुसतं गोड बोलून काम होत नाही,दुसऱ्याला दोषारोपण करून होत नाही. शेवटी लोकांना हवा असतो विकास. असा टोलाही त्यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला.
दरम्यान, प्रफुल्ल पटेल यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता त्यांना खडे बोल सुनावले. एकीकडे मोदी असताना दुसरीकडे कोण आहे;हेच लोकांना ठाऊक नसल्याचे पटेल म्हणाले. विरोधक म्हणतात आम्हाला निवडून द्या आम्ही योग्य प्रधानमंत्री देऊ असं यावेळी होत नाही? हा काय खेळ आहे येथे आपण कोणाला मतदान करतो हे माहित असणे अत्यंत गरजेचे असते. नुसतं दोषारोपण करून काम चालत नाही. देशात अनेक विकास काम झालेल.लोक बदलेले आहे.देश आता शिकलेला आहे तरुण युवकांचा आहे. देशांमध्ये खूप वेगाने विकास झालेला आहे.मतदारांच्या आकांक्षा वाढलेला आहे,ही गोष्ट नाकारता येणार नाही; असेही पटेल म्हणाले.
पटेल यांनी वाचून दाखवल्या मोदींच्या योजना
मोदींनी युवकांसाठी योजना आणली आहे. दहा लाखांपर्यंत बिना व्याजाचे कर्ज उपलब्ध झाले आहे. ही मर्यादा 20 लाखांपर्यंत जाणार आहे. 50 कोटी लोकांना मुद्रा लोन देण्यात आले. पहिल्यापेक्षा भंडारा गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी मोदी सरकारमध्ये समाधानी असल्याचे पटेल म्हणाले. लोकांना घरकुल मिळत आहे. शौचालय मिळाले,हर घर नल योजना ही मिळाली आहे. पूर्वी लोकांना खूप त्रास होत होता आता हळूहळू त्याना त्याचे समाधान मिळू लागले आहे. मोदी सरकारने लोकांच्या आरोग्य बाबत ही क्रांतिकारक निर्णय घेतले असल्याचे प्रफुल पटेल म्हणाले. असे क्रांतिकारक निर्णय घेऊन मोदींनी ते अमलात आणण्याचे प्रफुल पटेलांनी सांगून मोदी सरकारची पाठ थोपटली. ते गोंदियात प्रसार माध्यमांशी बोलत होते.