Buldhana constituency : बुलढाणा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण यांची त्वरित बदली करावी. बदलीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत 48 तासात त्यांना सक्तीच्या रजेवर जाण्याचा आदेश पारित करावा. चव्हाण यांच्या नियुक्ती पासून देण्यात आलेले सर्व प्रमाणपत्र, कंत्राट याची चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी. यासह अन्य मागण्यासाठी आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीशचंद्र रोठे यांनी स्वतःचे तोंड काळे करून अप्पर जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्यामार्फत भारतीय निवडणूक आयोग आणि मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार केली आहे. 48 तासात कारवाई न झाल्यास जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशाराही रोठे यांनी दिला आहे.
बुलढाणा येथील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांच्या विरोधात समोर येणाऱ्या तक्रारी आणि त्यावर वरिष्ठांकडे दाद मागितल्यानंतरही कारवाई होत नसल्याने काल शुक्रवारी सायंकाळी पीडित डॉक्टरांच्या सन्मानार्थ आणि या घटनेच्या निषेधार्थ आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीशचंद्र रोठे यांनी स्वतःचे तोंड काळे करून निवेदन दिले.
Buldhana News : भाजपच्या मतदारसंघात विहिर वाटपातून 16 कोटींचा भ्रष्टाचार?
निवेदनात नमूद करण्यात आले आहे कि, वादग्रस्त, भ्रष्टाचारी, हुकूमशहा जिल्हा शल्यचिकित्सक चव्हाण यांची त्वरित बदली करावी. चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी. त्यांच्या मालमत्तेची चौकशी करून अनधिकृत मालमत्ता शासन जमा करावी. जिल्ह्यातील शेतकरी शेतमजुरांनी बहिष्कार टाकलेल्या गावातील मागण्यांची पूर्तता करावी. पाणीटंचाईग्रस्त गावांना टँकर सुरू करावे. रोजगार हमी योजनेची कामे सुरू करावी. त्रस्त रुग्ण, कर्मचारी, डॉक्टरांच्या सन्मानार्थ आपले आंदोलन आहे, असेही आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश चंद्र रोठे यांनी म्हटले आहे. निवेदन सादर करताना त्यांचे सहकारी उपस्थित होते.