महाराष्ट्र

Maharashtra Lok Sabha Election : शांतिगिरी महाराजांनी ईव्हीएम मशीनला हार घातला

Nashik Constituency : कृतीमुळे गुन्हा दाखल होणार

Nashik Constituency : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात नाशिक लोकसभा मतदारसंघात मतदान सुरू आहे. दरम्यान, अपक्ष उमेदवार शांतिगीरी एक प्रकार समोर आला, चक्क ईव्हीएम मशीनला हार घातला. त्याची मतदारसंघात चर्चा झाली.  

नाशिक जिल्ह्यात चार हजार मतदान केंद्रात मतदान होणार असून एकूण 20 लाख 30 हजार 124 मतदार आहेत. अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी मतदान केले. मतदानाचा हक्क बजावताना ईव्हीएम मशिनला हार घातला. यामुळे शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. याआधी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ईव्हीएमची पूजा केली होती. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

Tumsar APMC : सीआयडी आली अन् बाजार समितीत पॅनल तयार करून गेली?

नेमका काय प्रकार घडला..

शांतिगिरी महाराजांनी सर्व हिंदुत्ववादी संघटनांकडून पाठिंबा मिळाल्याचा दावा केला होता. आज शांतिगिरी महाराज मतदान केंद्रावर पोहोचले. तेव्हा हा प्रकार घडला. दरम्यान शांतिगिरी महाराजांच्या सहकाऱ्याने त्यांच्या नावाने चिठ्ठ्या वाटप केल्याने पोलिसांनी कारवाई केली. मतदान केंद्रावर महाराजांच्या नावाने चिठ्ठ्या वाटप केल्याप्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी जनेश्वर महाराजांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे

शांतिगिरी महाराज हे बाबाजी भक्त परिवाराचे प्रमुख आहेत. महायुतीकडून उमेदवारीसाठी ते प्रयत्न करत होते. आता अपक्ष मैदानात उतरलेल्या शांतिगिरी महाराजांसह नाशिकमध्ये चौरंगी लढत होत आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!