National News : पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी लगेचच ‘ॲक्शन मोड’वर आले आहेत. सोमवारी (ता. 10) सकाळी पंतप्रधान कार्यालयात पोहोचून त्यांनी पदभार स्वीकारला. तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर मोदींनी पहिला निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी निर्णय घेत पंतप्रधानांनी कामाची सुरूवात केली . पंतप्रधानांनी स्वाक्षरी करून ‘पीएम किसान निधी’मध्ये 20 हजार कोटी रुपयांची रक्कम मंजूर केली. या निर्णयाचा फायदा 9.3 कोटी शेतकऱ्यांना होणार आहे. त्यांच्या स्वाक्षरीमुळे पीएम किसान निधीचा 17 वा हप्ता मंजूर झाला केला.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, सरकार शेतकरी कल्याणासाठी पूर्णपणे समर्पित आहे. पदभार स्वीकारल्यानंतर माझी पहिली फाइल शेतकऱ्यांच्या कल्याणाशी संबंधित असावी याचा मला अभिमान आहे. आगामी काळात सरकार शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी आणखी काम करेल. जगाचा पोशिंदा शेतकरी त्यासाठी काही कमी पडता कामा नये, असेही ते म्हणाले.
सरकारचे काम सुरू
राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी, शिवराजसिंह चव्हाण ज्योतिरादित्य यांचा समावेश एनडीए सरकारमध्ये आहे. त्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह एनडीएच्या विविध खासदारांनी मंत्रिपद आणि राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी, जे.पी. नड्डा आणि शिवराज सिंह चौहान यांनाही शपथ देण्यात आली. मोदींसह 58 मंत्र्यांनी शपथ घेतली. सरकारमध्ये मोदींसह 72 मंत्री असतील.
मंत्रिमंडळात 30 कॅबिनेट मंत्री आणि 5 स्वतंत्र प्रभार मंत्री आहेत. 36 राज्यमंत्र्यांचाही समावेश आहे. राष्ट्रपती भवनातील सोहळ्याला 7 देशांच्या नेत्यांशिवाय देशातील सिनेतारकांनीही हजेरी लावली. यात अक्षय कुमार, शाहरुख खान, विक्रांत मेस्सी आणि राजकुमार हिरानी यांचा समावेश होता. शपथविधीनंतर पदभार स्वीकारत मोदींनी शेतकऱ्यासाठी निधी दिला आहे.