महाराष्ट्र

Lok Sabha Election : महाराष्ट्राने शरद पवारांचा हिशोब करावा 

Madha Constituency : माळशिरसमधून नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

Narendra Modi : महाराष्ट्राची जनता आशीर्वाद देताना कोणतीही कसर ठेवत नाही. जे लोक वचन पूर्ण करत नाहीत, त्यांचा हिशेबही महाराष्ट्रातील जनता बरोबर करते. त्यांना बरोबर लक्षात ठेवते. एक मोठा नेता माढ्यात निवडणूक लढविण्यासाठी आला होता. मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघातील दुष्काळी भागाला पाणी पोचविण्याची शपथ घेतली होती. त्यांनी या ठिकाणी पाणी पोचवले नाही. त्यांना आता शिक्षा देण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाव न घेता ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला.

रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदी यांची माळशिरस येथे सभा झाली. सभेत सुरुवातीलाच मोदी यांनी पाण्यावरून शरद पवार यांना लक्ष्य केले. ते म्हणाले, महाराष्ट्राची जनता आशीर्वाद देताना कोणतीही कसर ठेवत नाही. जे लोक वचन पूर्ण करत नाहीत, त्यांचा हिशेबही महाराष्ट्रातील जनता बरोबर करते. मोदी यांनी आज पुन्हा मराठीतून भाषणाची सुरुवात केली.

माफी मागितली 

विकासित भारतासाठी मी मत मागायला आलो आहे. मी वेळेत येतो. दूरवरून येणाऱ्या लोकांची गैरसोय होते. त्यामुळे मला क्षमा करा. काही राजकीय नेत्यांनी सभेला उशीरा येण्याची फॅशन केली होती. काही लोक अजूनही येत आहेत. त्यांची मी माफी मागतो. पण मला पुढील सभेसाठी जायचे असल्याने मी वेळेत आलो आहे. मला माफ करा, या शब्दांत मोदींनी उशिरा लोकांची माफी मागितली.

मोदी म्हणाले, माढ्यातील माता बहिणी मला आशीर्वाद देण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने आल्या आहेत. त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. काँग्रेसचे ग्रामपंचायतपासून संसदेपर्यंत राज्य होते. आपल्या सेवकाने या मोदीने विकास करून दाखवला आहे. काँग्रेसचे पंतप्रधान आणि नेते फक्त गरीबी हटविण्याचा नारा देत होते. आम्ही गेली दहा वर्षांत 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यात यश मिळाले आहे. गरीबीतून बाहेर आलेल्या लोकांचे पुण्य मतदारांना जाते. त्यांनी मला सेवा करण्याची संधी दिली. जेव्हा देशात मजबूत सरकार असते, तेव्हा वर्तमान काळाबरोबरच भविष्याकडे लक्ष असते. त्यामुळे रेल्वे, महामार्ग, इतर पायाभूत सुविधांसाठी काम करण्यात येत आहे, असे मोदी म्हणाले.

Lok Sabha Election : चंद्रशेखर बावनकुळेंकडून उद्धव ठाकरेंचा पुन्हा महानालायक म्हणून उल्लेख

काँग्रेसला जनतेने 60 वर्षे राज्य करण्याची संधी दिली. मात्र, काँग्रेस शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोणी पोचवू शकली नाही. जवळपास 100 योजना अनेक वर्षांपासून प्रलंबित होत्या. त्यातील 26 योजना महाराष्ट्रातील होत्या. सर्वांना पणी देण्याची माझी योजना आहे. सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी मी संपूर्ण ताकद लावली आहे. आतापर्यंत 36 योजना पूर्ण झाल्या आहेत. अनेक योजनांचे काम सुरू आहे, असे मोदी म्हणाले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!