देश / विदेश

NDA Metting : सगळेच म्हणाले, ‘फिर एक बार’ मोदीच पाहिजे पंतप्रधान

Narendra Modi : ‘फेविकॉल का मजबूत जोड़ है, टूटेगा नहीं’

Political News : 2024 मधील लोकसभा निवडणुकीत भाजपचे पूर्ण बहुमत हुकले. एनडीएने एकूण 293 जागा मिळवून 272 जागांचा (बहुमत) आकडा गाठला आहे. निकालानंतर नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. ते पुन्हा एकदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यासाठी एनडीएची आज बैठक झाली. या बैठकीत नरेंद्र मोदी यांची संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड झाली. भारतीय जनता पक्षाने आपल्या सर्व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना शुक्रवारी बैठकीसाठी राजधानी दिल्लीत बोलावले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा आढावा घेण्यासाठी ही बैठक होत आहे. 7 जून रोजी दिल्लीत भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची ही बैठक होणार आहे. 9 जून रोजी नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत. नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षांमध्ये संपूर्ण काळ देशाची सेवा केली. आता जी काही कसर राहिली आहे, ती आम्ही या खेपेस भरुन काढू. या काळात सगळे दिवस आम्ही मोदींसोबत राहू, असा ठाम निर्धार संयुक्त जनता दलाचे नेते नितीश कुमार यांनी व्यक्त केला.

सेंट्रल होलमध्ये बैठक

नरेंद्र मोदी यांची NDA नेतेपदी निवड झाल्यानंतर एनडीएच्या घटकपक्षांची आज संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये (Central Hall) बैठक झाली. यावेळी नितीश कुमार यांना नरेंद्र मोदी लवकरात लवकर देशाचे पंतप्रधान व्हावेत, यासाठी घाई झाल्याचे दिसले. त्यांनी म्हटले की, माझा आग्रह आहे की, तुम्ही लवकर शपथ घ्या. तुम्ही आता रविवारी शपथ घेणार आहात. माझ्या मते तुम्ही आजच पंतप्रधानपदाची शपथ घेऊन कामाला सुरुवात केली पाहिजे होती. तुमच्या कामामुळे देशाला फायदा होईल. आपण सगळे एकत्र राहू, मोदींचे ऐकून आपण पुढे चालत राहू, असेही नितीश कुमार यांनी म्हटले.

नायडूही सोबत

एनडीए संसदीय पक्षाच्या बैठकीत टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू म्हणाले, आम्ही आश्चर्यकारक बहुमत मिळवले. आम्ही सर्वांचे अभिनंदन करतो. मी निवडणूक प्रचारादरम्यान पाहिले, तीन महिन्यांपासून मोदींनी कधीही विश्रांती घेतली नाही. रात्रंदिवस त्यांनी काम केले आहे. त्याच भावनेने त्यांनी प्रचार केला. आंध्र प्रदेशात आम्ही तीन जाहीर सभा घेतल्या. एक मोठी रॅली केली. त्यामुळे आंध्र प्रदेशात निवडणूक जिंकण्यात मोठा फरक पडला आहे.

संविधानाला नमन

NDA संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “मी या सभागृहात उपस्थित असलेल्या सर्व घटक पक्षांचे नेते, नवनिर्वाचित खासदार, राज्यसभा खासदार यांचे आभार व्यक्त करतो. ही आनंदाची बाब आहे, की मला आज एवढ्या मोठ्या समुहाचे स्वागत करण्याची संधी मिळाली. जे विजयी झाले आहेत, त्या लाखो कार्यकर्त्यांना मी आज या सभागृहातून नमस्कार करतो.” मोदी पुढे म्हणाले, “मी खूप भाग्यवान आहे, की सर्वांनी एकमताने माझी एनडीएचा नेता म्हणून निवड केली. तुम्ही सर्वांनी मला एक नवीन जबाबदारी दिली आहे. मी तुमचा खूप आभारी आहे.” भाषण सुरू करण्यापूर्वी मोदी यांनी भारतीय संविधानाला नमस्कार केला.

Lok Sabha Result : निकालादरम्यान सोशल मीडियाने वाढवली उत्सुकता ! 

2024 मधील लोकसभा निवडणुकीत एनडीए आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. नवे सरकार स्थापन करण्यासाठी सर्व नेते जुन्या संसद भवनात एकत्र आलेत. एनडीएच्या बैठकीत मोदी यांची आघाडीचे नेते म्हणून निवड करण्यात आली. सर्वांनी मोदींना पाठिंबा दिला. एकनाथ शिंदे यांनी एनडीए आघाडीला ‘फेव्हिकॉल का मजबूत जोड’, असे वर्णन करून ते तुटणार नसल्याचे सांगितले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!