New Project : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर शनिवारी (ता. 13) पहिल्यांदाच मुंबईला भेट दिली. यावेळी मोदींनी गोरेगाव-मुलुंड लिंकरोडसह 30 हजार कोटींच्या विविध विकास कामांचे लोकार्पण केले. विकसित भारताच्या निर्माणासाठी महाराष्ट्राची मोठी भूमिका असल्याचे मोदी म्हणाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मोदींवर स्तुतीसुमने उधळली. यावेळी मोदींनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. लोकांनी आमच्या तिसऱ्या सरकारचा उत्साहाने स्वागत केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, लोकांना माहित आहे एनडीए सरकारच स्थिरता देऊ शकते. तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर मी म्हटले होते की, तिसऱ्या टर्ममध्ये एनडीए सरकार तीनपट वेगाने काम करेल. महाराष्ट्राकडे गौरवशाली इतिहास आहे. महाराष्ट्राकडे सशक्त वर्तमान आहे. महाराष्ट्राकडे समृद्ध भविष्याचे स्वप्न आहे. विकसित भारताच्या निर्माणासाठी महाराष्ट्राची मोठी भूमिका आहे. महाराष्ट्रात उद्योगांची शक्ती आहे. महाराष्ट्रात शेतीची शक्ती आहे. महाराष्ट्राकडे आर्थिक शक्ती आहे. या शक्तीमुळे मुंबई आर्थिक हब बनले आहे, असे मोदी म्हणाले.
‘पावर हाऊस’ बनविणार
महाराष्ट्राला जगातील सर्वांत मोठे आर्थिक पावर हाऊस बनवायचे आहे. गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये बोलताना मोदी म्हणाले, महाराष्ट्रात आणि मुंबईतील 30 हजार कोटींच्या प्रकल्पाच्या लोकापर्णासाठी आपण आलो आहोत. या प्रकल्पांमुळे मुंबई आणि परिसरातील कनेक्टिव्हीटी चांगली होईल. रेल्वे आणि रोडच्या योजनांशिवाय महाराष्ट्रातील युवकांच्या कौशल्य योजनांची मोठी योजना सामील आहे. यामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. काही आठवड्यांआधी केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी वाढवण बंदराला मंजुरी दिली आहे. 76 हजार कोटींच्या या प्रकल्पामुळं येथे दहा लाखांहून अधिक रोजगार बनतील, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.
लोकांनी आमच्या तिसऱ्या सरकारचा उत्साहाने स्वागत केले. लोकांना माहिती आहे की, एनडीए सरकारच स्थिरता देऊ शकते. महाराष्ट्राकडे गौरवशाली इतिहास आहे. महाराष्ट्राकडे सशक्त वर्तमान आहे. महाराष्ट्राकडे समृद्ध भविष्याचे स्वप्न आहे. विकसित भारताच्या निर्माणासाठी महाराष्ट्राची मोठी भूमिका आहे. महाराष्ट्रात उद्योगांची शक्ती आहे. महाराष्ट्रात शेतीची शक्ती आहे. महाराष्ट्राकडे आर्थिक शक्ती आहे. या शक्तीमुळे मुंबई आर्थिक हब बनले आहे. याच शक्तीमुळे महाराष्ट्राला जगातील सर्वांत मोठे आर्थिक पावर हाऊस बनवायचे आहे. मुंबईला जगातील बुद्धीवंतांची राजधानी बनवण्याचा उद्देश असल्याचे मोदी म्हणाले.
महाराष्ट्र टुरीझममध्ये नंबर वन राज्य बनावे, अशी इच्छा आहे. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे विशाल गडकिल्ले आहेत. कोकणच्या समुद्र किनाऱ्यावर मनमोहक दृष्य आहे. महाराष्ट्र भारतात विकासाची नवीन गाथा लिहिणार आहे, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) त्याचबरोबर राज्य मंत्रिमंडळातील मंत्री या कार्यक्रमाला उपस्थित होते.
मुंबईला फायदा
विकास प्रकल्पांमुळे मुंबईकरांना (Mumbaikar) मोठा फायदा होणार आहे. त्याच बरोबर मुंबई शहर वेगवान होणार आहे. या विकास प्रकल्पांसाठी 29 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. ठाणे-बोरीवली दुहेरी भुयारीमार्ग आहे. या 16 हजार कोटींच्या प्रकल्पाचे यावेळी लोकार्पण करण्यात आले. हा एक ट्वीन टनल स्वरूपाचा प्रकल्प असणार आहे.
बोगद्याची लांबी जवळपास 11.8 किलोमीटर असणार आहे. दोन्ही बोगद्यांमधील जमिनीलगतचे सुरक्षित अंतर हे 13.5 मीटर असेल. दोन्ही बोगदे प्रत्येकी 2 मार्गिका एक आपत्कालीन मार्गिकेचे असतील. ठाणे ते बोरिवली प्रवास 12 मिनिटांत यामुळे शक्य होणार आहे.