महाराष्ट्र

Congress : मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

Mahayuti : नाना पटोले यांची मागणी; बदलापूर प्रकरणी मविआचे मूक आंदोलन

Political War : बदलापूरमध्ये झालेली घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. त्या दोन चिमुकल्यांवर १५ दिवसांपासून अत्याचार सुरू होता, अशी माहिती आता पुढे येत आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये अत्याचाराच्या घटना घडत आहेत. सरकार मुली व महिलांचे रक्षण करण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. शासन व प्रशासनाचा वचक नसल्याने अशा घटना वाढत आहेत. याला सर्वस्वी मुख्यमंत्री व गृहमंत्री जबाबदार आहेत. म्हणून दोघांनीही राजीनामे द्यावेत, अशी मागणी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

बदलापूरमध्ये लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचा निषेध करत महाविकास आघाडीने बंद पुकारला होता. मुंबई उच्च न्यायालयाने बंद करण्यास मनाई केल्यानंतर राज्यभर काळ्या फिती लावून मूक आंदोलन करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष नसीम खान, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आदींच्या नेतृत्वात आंदोलन झाले. भर पावसात हे आंदोलन करण्यात आले. विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरमध्ये आंदोलनात भाग घेतला.

बाळासाहेब थोरात म्हणाले, ‘युती सरकारच्या काळात राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे. गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिलेला नाही. सरकारला माता भगिनींच्या सुरक्षेचे काही पडलेले नाही. फक्त राज्याला ओरबाडून खाण्याचे काम सुरु आहे. आता या सरकारला घालवावे लागणार आहे.’

नागपूरमध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार विकास ठाकरे आणि आमदार अभिजित वंजारी यांनी संविधान चौकात मुक आंदोलन केले. वडेट्टीवार म्हणाले, ‘राज्यात महिला अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. जानेवारीपासून आतापर्यंत 2141 महिला मुलींवर अत्याचार झाले. मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्या जिल्ह्यातच कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही. बदलापूर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सरकारकडून झाला. उच्च न्यायालयाने महायुती सरकारचे थोबाड लाल केले. जनतेने उद्रेक केल्यानंतर कारवाईला सुरुवात झाली. विकृत, चोर, लुटारू, दरोडोखोर सरकारचा निषेध करण्यासाठी व आरोपीला लवकरात लवकर फाशी व्हावी.’

Pravin Darekar : महाविकास आघाडीतील नेत्यांच्या जाणीवा मेल्यात

शरद पवारही आंदोलनात

पुणे येथील आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सहभागी झाले. त्यांच्यासोबत प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी उपस्थित होते. शिवसेना भवनासमोर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. छत्रपती संभाजी नगरमध्ये विधान परिषदचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार कल्याण काळे, संभाजीनगर काँग्रेसचे अध्यक्ष युसुफ शेख यांनी आंदोलनात भाग घेतला.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!