Mahayuti : या सरकारची परिस्थिती आता कौरवासारखी आहे. हे आपसांतच लढत आहेत. असेच लढून यांचा कार्यक्रम होणार आहे. मलाईदार खात्यांची लढाई खूप लांब चालली. आता मलाईदार जिल्ह्यांसाठी त्यांच्या भांडणे होणार आहेत. अधिवेशनामध्ये साधा मंत्रिमंडळ विस्तार ते करू शकले नाहीत. जनतेच्या प्रश्नांचं घेणंदेणं नसलेलं हे सरकार आहे, अशी टिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
आज (22 डिसेंबर)सकाळी नागपुरात नाना पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, लोकशाही विरोधी नवीन इतिहास निर्माण करण्याचे काम महायुती सरकार करत आहे. हिंमत असेल तर मारकडवाडीत बॅलेटच्या माध्यमातून सरकारे मॉकपोलिंग करून मतदान घेतलं पाहिजे. जनतेची मतं चोरून हे सरकार आलेलं आहे. निवडणूक आयोगाने जे काही नोटिफिकेशन काढलं, त्यानुसार ‘दाल मे कूच काला है..’, असं म्हणण्यास पूर्ण वाव आहे.
असे का?
निवडणूक आयोगाकडून आता कुठलीही माहिती जाहिर केली जाणार नाही, असं नोटीफिकेशन काढण्यात आले आहे. याचा अर्थ लोकशाही संपुष्टात आणण्याच्या प्रयत्नात भाजपने एक पाऊल पुढे टाकलेले आहे. हे सरकार जनतेच्या मतांनी निवडून आलेले नाही. तर जनतेची मते चोरून आणि निवडणूक आयोगाच्या गडबडीमुळे हे सरकार आलेले आहे, असा स्पष्ट आरोप नाना पटोले यांनी केला.
राहुल गांधी नांदेडला येऊन त्यानंतर रस्ते मार्गाने परभणीला जाणार आहेत. या त्यांच्या दौऱ्यात काहीतरी बदल करण्याचा आमचा प्रयत्न आहे. पीडिताच्या कुटुंबीयांशी आणि गावकऱ्यांशी राहुल गांधी संवाद साधतील. भाजपचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राहुल गांधी यांच्यावर टिका केली आहे. याबाबत विचारले असता, नौटंकी किंवा हिटलरशाही या दोन शब्ंदाचा वापर केला पाहिजे. लोकशाहीत हुकूमशाहीचा वापर केला जात आहे.
गुन्हे
जनता रस्त्यावर येते तेव्हा कोंबिंग ऑपरेशन करून गुन्हे दाखल केले जातात. भाजप लोकशाहीवर विश्वास न ठेवणारा पक्ष आहे. आम्ही लोकांवर लाठीचार्ज करू, गोळ्या झाडू आणि लोकांना गुलाम बनवू, असे चित्र बावनकुळे यांच्या बोलण्यातून दिसत आहे. जेव्हा देशावर इंग्रजांचं राज्य होतं, तेव्हाही भाजपवाले इंग्रजांसोबत होते. आजही आम्ही लोकांसोबत इंग्रजांसारखं वागू, असंच त्यांच अन्याय झालेल्या लोकांच्या मदतीसाठी कुणी येत असेल, तर त्याला भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी नौटंकी म्हणणे, हे त्याचेच द्योतक आहे, असे नाना पटोले म्हणाले.