Ladaki bahin Yojana : राज्य सरकारकडे शेतकऱ्यांना द्यायला पेसे नाहीत. पद भरती करण्यासाठी पैसै नाहीत. कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यासाठी पैसे नाहीत. अशा परिस्थितीत नवनवीन योजना आणून पैसा कशापायी खर्च केला जात आहे. परवा परवा सर्वोच्च न्यायालयाने सरकारला सरकारला फटकार लगावली. आता ‘लाडकी बहीण’ योजनाही बंद पडू शकते, असे म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर ताशेरे ओढले.
मुंबई येथील षण्मुखानंद सभागृहात आज, शुक्रवारी (ता. 16) महाविकास आघाडीचा निर्धार मेळावा झाला. यावेळी नाना पटोले बोलत होते. ते म्हणाले, ‘लाडकी बहीण’ योजनेबद्दल आज आनंद वाटत असेल. पण सरकारने शेतकरी स्वाभीमान योजना काढली. त्यामध्ये 6000 रुपये दिले जातात. पण तो शेतकरी व्यवसायीक नसावा. त्याच्या परिवारातील कुणी व्यवसाय करत नसावा. भविष्यातही व्यवसाय केला तर पैसै परत घेतले जाणार आहेत. अशा अटी लादल्या गेल्या आहेत.
पंतप्रधान कार्यालयातून जिल्हाधिकाऱ्यांना पत्र येते. अटीचे उल्लंघन केलेल्या शेतकऱ्यांकडून ते पैसे परत घेतले जातात. लाडकी बहीण योजनेबाबतही असेच होऊ शकते, अशी भीती नाना पटोले यांनी व्यक्त केली. निवडणूक झाल्यावर बहीणींकडूनही हे पैसे परत घेऊ शकतील. लाडक्या बहिणीसाठी नव्हे तर लाडक्या खुर्चीसाठी त्यांचा हा खटाटोप सुरू असल्याचा घणाघात त्यांनी केला.
Assembly Election : जम्मुत तीन, हरियाणात एकाच टप्प्यात मतदान
राम मंदिराला गळती..
पिकांची नुकसान भरपाई द्यायला सरकारकडे पैसे नाहीत. कर्मचाऱ्यांची पदे भरण्यासाठी पैसै नाहीत. पवित्र पोर्टलच्या नावाने पैसे जमा केले जात आहेत. राम मंदिरात गळती लागली. नवीन संसदेतही गळती लागली आहे. येवढेच काय तर पदभरती परीक्षांच्या पेपरमध्येही गळती लागली असल्याचा घणाघात नाना पटोले यांनी केला.
प्रोत्साहनाचे 50000 द्यायचेय..
महाविकास आघाडीला महिलांच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्रात योजना सुरू करायच्या आहेत. कर्नाटक, तेलंगणात राहुल गांधींनी जी घोषणा केली, त्याची पूर्तता करण्याचे काम सुरू झाले आहे. हेच काम महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार करेल. आमच्या मागील सरकारमध्ये पहिल्याच नागपूरच्या अधिवेशनात कर्जमाफीची घोषणा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आम्ही केली होती. तेव्हा निवडणुका नव्हत्या. पण शेतकऱ्यांसाठी प्रामाणिक आमचं सरकार होतं. कोरोनाच्या वेळेतले प्रोत्साहनाचे 50000 रुपये दिले नाही. आता आमचे सरकार आल्यावर जयंतराव आपल्याला ते द्यायचे आहेत, असे जयंत पाटील यांना उद्देशून नाना पटोले म्हणाले.
बहुमतांच सरकार आणायचंय..
महाविकासचा मुख्यमंत्री कोण, याचे वातावरण तयार केले जात आहे. आम्हाला महाराष्ट्रातील या भ्रष्टाचारी सरकारला हाकलायचे आहे. धर्म आणि स्वाभीमान गुजरातला विकणारे सरकार उद्धवस्त करायचे आहे. मुख्यमंत्री कोण होणार, हे वरिष्ठ नेते ठरवतील. पण आज आपल्याला बहुमताचं सरकार आणायचं आहे. त्यासाठी एकजुटीने कामाला लागा, असे आवाहन नाना पटोले यांनी केले.