Political War : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संपूर्ण महाराष्ट्रात दौरा करीत आहेत. या दौऱ्यातून ते केंद्र आणि राज्य सरकारवर सडकून टिका करीत असल्याचे दिसून येत आहे. आता पुन्हा एकदा अदानीच्या मुद्द्यावरून त्यांनी केंद्र आणि राज्यातील महायुती सरकारला लक्ष्य केले आहे. सरकार अदानीसाठी सरकारची तिजोरी खुली करत आहेत तर शेतकऱ्यांच्या पाणीपट्टी करा मध्येही वाढ करण्यात आल्याचा घणाघात नाना पटोले यांनी केला आहे.
ते पुण्यात प्रसार माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते. केंद्र सरकार आणि महायुतीतील नेत्यांवर त्यांनी निशाणा साधला. सोबतच त्यांनी विकासाचा प्रश्न उपस्थित केला. पंतप्रधानांनी शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या योजनांवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला.
https://whatsapp.com/channel/0029VaUpEJn7YSd10QyUIR35
बागायती शेतीसाठी 10 टक्के पाण्याचे दर वाढवण्यात आले. कोरडवाहूसाठी 7 टक्क्यांनी पाणीपट्टी कर दर वाढविण्यात आले आहे, याचा निषेध नोंदवित असल्याचे त्यांनी सांगितले. सरकार फक्त उद्योगपतींचे आहेत. हे आम्ही वारंवार सांगत होतो. आता याच गोष्टीला प्रमाणित करण्याचे काम सरकार करत आहे. मोठ्या उद्योगासाठी विद्युत माफ, पाणी माफ, सर्व काही माफ. त्यांना पाण्यासाठी उपाययोजना करून देतात. त्यासाठी लागणारा सर्व खर्च सरकारच्या तिजोरीतून करायचा. नाही झाले तर बँकेचे कर्ज करून नियोजन करायचे. सरकारचा हा दृष्टिकोन झालेला आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला.
केंद्राच्या जीवावर अदानींचे खेळ
केंद्र सरकार पैसे देतात. पण या पैशाच्या नावावर अदानी आपले खेळ करतो. अर्थातच सरकारच्या तिजोरीतून सर्व पैसा जातो. पण व्यवस्थेचे काम अदानी पाहतात. या सर्व गोष्टींचा मुद्दामून त्यांनी उल्लेख केला आहे, असे पटोलेंनी आवर्जून सांगितले. राज्य सरकारकडून 75 टक्के जागा त्यांना देण्याचे काम सुरू आहे. गरीब जनतेला झोपडी बांधण्याकरिता पैसे नाही आणि जागा नाही. पण अदानी सारख्या व्यक्तीसाठी या सरकारकडे पैसा आणि जागा आहे. हा प्रयत्न देखील या सरकारचाच आहे. मुठभरांसाठी सरकार आहे, असा घणाघात त्यांनी केला.
शेतकऱ्यांची फसवणूक केली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही शेतकऱ्यांसाठी एमएसपी घोषित केले. एकीकडे पाणीपट्टीचे दर वाढवण्यात आले तर दुसरीकडे खतांचे औषधींचे दर वाढविण्यात आले आणि शेतीतून होणाऱ्या उत्पन्नाचे भाव कमी करण्यात आले. महागाईमध्ये त्यांनी पाणीपट्टीचे दर वाढवले. हे कितपत योग्य आहे, असा प्रश्न पटोले यांनी उपस्थित केला. महागाई वाढवण्याचे पाप भाजप सरकार करत आहे असा आरोप केला.
Sudhir Mungantiwar : विरोधकांनी मतदारांमध्ये खोटा प्रचार केला
या सर्व गोष्टीचा आम्ही विरोध करतो आणि येणाऱ्या विधानसभेत या सर्व गोष्टी बाबत आम्ही मुद्दे मांडणार आहोत, असे देखील ते म्हणाले.
महायुतीत सुरू असलेल्या कुरघोडींबाबत विचारणा केली असता, त्यांच्यावर काही बोलण्याजोगे नाही तर काय बोलू, असा टोला त्यांनी लगावला.
एमपीएससी यूपीएससी उत्तीर्णांचा सत्कार
महाराष्ट्रात जास्तीत जास्त एमपीएससी यूपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक विकासाचा मार्ग तयार व्हावा. यामध्ये त्यांनी यश प्राप्त करावे यासाठी काँग्रेस पक्षातर्फे दरवर्षी त्यांचा सत्कार करण्यात येतो. त्याचे नियोजन सुद्धा करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याचे हे पाचवे वर्ष असल्याचे त्यांनी सांगितले.