महाराष्ट्र

Nana Patole : निगेटिव्ह मार्क असूनही सगळेच कसे पास झाले ‘नीट’

Congress : भाजपाने विद्यार्थ्यांचेही आयुष्य केले अंधकारमय 

Congress : डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगलेल्या विद्यार्थ्यांना NEET परीक्षेत झालेल्या घोटाळ्याचा मोठा फकटा बसला आहे. त्यांच्या स्वप्नावर पाणी फेरले आहे. या परिक्षेत गैरप्रकार झाल्याने लाखो विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवरही अन्याय झाला असून सरकारी आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळणे कठीण झाले आहे. नीट परिक्षेतील घोटाळा पाहता या प्रकरणाची सर्वंकश चौकशी करावी तसेच निकालाचे फेरमुल्यांकन करावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

एका परीक्षा केंद्रावरील 67 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी म्हणजे 720 पैकी 720 गुण मिळाले आहेत. निगेटिव्ह मार्किंग प्रणाली असताना पैकीच्या पैकी गुण कसे मिळाले ? निगेटीव्ह मार्किंग सिस्टीममुळे एक उत्तर चुकले तर 5 मार्क कमी होतात. पण काहींना 716, 718 गुण मिळाल्याचेही दिसत आहे. यामुळे हा प्रकार संशयास्पद वाटतो.

भाजपा कार्यप्रणालीत असे का? 

वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळण्यासाठी ही परिक्षा अत्यंत महत्वाची आहे. ज्या विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास करून ही परिक्षा दिली, त्यांच्यावर हा अन्याय झाला आहे. या गैरकारभारात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. भाजप सरकारने विद्यार्थ्यांचे आयुष्यही अंधकारमय करून टाकले आहे. घोटाळे, गैरकारभार, पेपरफुटी असे प्रकार सर्रास होत आहेत. काँग्रेस पक्षाने सत्तेत आलो तर पेपरफुटी वरोधात कठोर कायदा करण्याचे आश्वासन दिले होते. कठोर कारवाई की करण्यात यावी ही मागणी त्यांनी केली

Sikkim Politics : सिक्कीममध्ये प्रेमसिंह तमांग यांचे 2.0

संसदेत उठवणार आवाज

नीट’ परीक्षेत झालेल्या गैरव्यवहारामुळे तुमच्यावर झालेल्या अन्यायाबाबत संसदेत तुमचा आवाज म्हणून नेटाने काम करेन, असे आश्वासन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दिले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!